Bank Of Baroda Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर होण्याची संधी; मिळणार १,३५,००० रुपये पगार; अर्ज कसा करावा?

Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १३५००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करायची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच bankofbaroda.in यावर जाऊन अर्ज करायचा आहे. (Bank of Baroda Recruitment)

बँक ऑफ बडोदामध्ये १२६७ व्यवस्थापक आणि इतर अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी म्हणजे उद्याच आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये ग्रामीण आणि कृषी बँकिंगमध्ये २०० पदे भरण्यात येणार आहे.MSME बँकिंगमध्ये ३४१ पदे भरण्यात येणार आहे. सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये २२ पदे भरण्यात येणार आहे. कॉर्पोरेट आणि संस्थात्मक क्रेडिटमध्ये ३० पदे भरण्यात येणार आहे.फायनान्समध्ये १३ पदे भरण्यात येणार आहे. इन्फॉर्मेशन अँड टेक्नोलॉजीमध्ये १७७ रिक्त पदे आहेत.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन टेस्ट, सायकोमॅट्रिक टेस्टद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत घेतली जाईल. या नोकरीसाठी ऑनलाइन चाचणीत निवड झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४८,४८० ते १,३५,०२० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT