Indian Overseas Bank Recruitment Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: इंडियन ओवरसीज बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, ४०० पदांसाठी निघाली भरती, पगार ८५९२० रुपये, जाणून घ्या सविस्तर

Indian Overseas Bank Recruitment 2025: इंडियन ओवरसीज बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ओवरसीज बँकेत सध्या नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ओवरसीज ही खूप चांगली बँक आहे. बँकिंग क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. इंडियन ओवरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

इंडियन ओवरसीज बँकेतील या नोकरीसाठी तुम्हाला iob.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

इंडियन ओवरसीज बँकेतील या भरतीमध्ये ४०० पदे भरती केली जाणार आहे. जर तुम्हाला बँकेत ऑफिसर व्हायचे असेल तर ही संधी आजिबात सोडू नका.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे निश्चित करण्यात आली आहे. इच्छुकांनी ३१ मेपूर्वी अर्ज करायचे आहेत.

इंडियन ओवरसीज बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री प्राप्त केलेली असावी. ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

इंडियन ओवरसीज बँकेतील या नोकरीसाठी २० ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

इंडियन ओवरसीज बँकेतील या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला ८५९२० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता, एचआरए आणि अनेक सुविधादेखील मिळणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्यूद्वारे होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT