बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ट्रेनी असोसिएट आणि ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर होती. मात्र, ही तारीख वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. (Maharashtra State Co-Operative Bank Recruitment)
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत मॅट्रिकपर्यंत मराठी विषय असणे गरजेचे आहे. ट्रेनिंग असोसिएट पदासाठी इच्छुक उमेदवाराला इंग्रजी किंवा मराठी टायपिंगचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
ट्रेनिंग असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ३२ पर्यंत असावे.तर ट्रेनिंग ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३२ ते ३८ वर्ष असावे. (Bank Job)
या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी mscbank.com या वेबसाइटला भेट द्यायची आहे. तिथे दिलेल्या करिअर बटणवर क्लिक करा. त्यानंतर नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमची नोंदणी करावी. यानंतर तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायची आहे. या अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
महाराष्ट्र स्टेट बँकेच्या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ११८० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर कनिष्ठ अधिकारी पदासाठी ११७० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.