GRSE Recruitment Saam Tv
naukri-job-news

GRSE Recruitment 2024: GRSE 2024 Job : बड्या कंपनीत HR ची नोकरी, अर्जप्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या?

GRSE Jobs 2024 : गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (GRSE) ने एच आर पदासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर पदवीधर असाल असाल तर तुम्हाला गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड ने २३६ जागांची भरती सुरु केली आहे. त्यात एचआर आणि शिकाऊ प्रशिक्षणार्थी रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. तुम्हाला यात नोंदणी करायची असल्यास ‘jobapply.in/grse2024app’ या अ‍ॅपवर तुम्ही अर्ज करु शकता. याची मुदत १९ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. हा अर्ज भरण्याची शेवटची तारिख १७ नोव्हेंबर असणार आहे.

गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरतीच्या दरम्यान निवडलेल्या उमेदवारांना ट्रेनीच्या पदासाठी नियुक्त केले जाणार आहे. यात एचआर पदासाठी सगळ्याच इच्छुक लोकांना अर्ज करता येणार आहे. ऑक्टोबर च्या १९ तारखेपासून या भरतीची प्रक्रीया सुरु झाली आहे.

हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घरच्याघरी भरता येणार आहे. यात उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र असणे गरजेचे आहे. यात पात्रता , वयोवमर्यादा इत्यादींबद्दल जाणून घेण्यासाठी उमेदवार खालील सुचनांची पाहणी करु शकता.

रिक्त जागा तपशील:

१. तुम्ही ट्रेड अप्रेंटिस (एक्स आयटीआय) पदासाठी इच्छुक असाल तर त्यासाठी एकूण ९० जागा असणार आहेत.

२. तुम्ही जर ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर) साठी इच्छुक असाल तर त्यासाठी एकूण ४० जागा असणार आहेत.

३. तुम्ही जर पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी इच्छुक असाल तर त्यासाठी एकूण ४० जागा असणार आहेत.

४. तुम्ही जर तंत्रज्ञ शिकाऊ पदासाठी इच्छुक असाल तर त्यासाठी एकूण ६० जागा असणार आहेत.

५. एचआर प्रशिक्षणार्थी पदासाठी इच्छुक असाल तर ६ जागा रिक्त असणार आहेत.

यासर्व पदासाठी तुमचे वय २६ वर्षांपेक्षा जास्त नसावे. एच आर प्रशिक्षणार्थी रिक्त पदांसाठी, उमेदवारांना एमबीए / पीजी पदवी / पीजी डिप्लोमा पदवीधर आणि दोन वर्षांचा पूर्ण वेळ प्रथम श्रेणी किंवा ६० टक्के (एससी/एसटी/ओबीसी/पीएच उमेदवारांसाठी ५५ टक्के) अर्ज आवश्यक आहेत. मानव संसाधन व्यवस्थापन / मानव संसाधन विकास / कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / सामाजिक कार्य / कामगार या क्षेत्रात शिकलेले उमेदवार हा अर्ज भरु शकतात.

Written By : Sakshi Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe case : बिल अदा करण्यासाठी २ लाखाची मागणी; बीडीओसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Sameer Bhujbal : छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची वेगळी चूल; महायुतीच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार

Amit Shaha News : शहांच्या राज्यातील भाजप नेत्यांना सक्त सूचना | Video

Ear Piercing: लहानपणी मुलांचे कान का टोचतात?

Maharashtra News Live Updates: अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; घड्याळ चिन्ह वापरता येणार

SCROLL FOR NEXT