Akashvani Job Saam Tv
naukri-job-news

Akashvani Job: सरकारी नोकरी अलर्ट, ऑल इंडिया रेडिओमध्ये या पदासाठी भरती; वाचा सर्वकाही

All India Radio Recruitment 2024: आकाशवाणीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. आकाशवाणी येथे वार्ताहर पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आकाशवाणी पुणेअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. ऑल इंडिया रेडिओमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. याबाबत वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, आकाशवाणी, पुणे द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

प्रसारभारती विभागात भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. २४ ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. वार्ताहर पदासाठी ही भरती केली जाणार आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. (All India Radio Recruitment)

वार्ताहर पदासाठी पत्रकारिता किंवा जन-संज्ञापनातील पदव्युतर पदविका/ पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत मान्यताप्राप्त विद्यापीठातून शैक्षणिक पदवी आणि किमान दोन वर्षाचा पत्रकारिता क्षेत्रात कामाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार या त्याच जिल्ह्याचा रहिवासी असावा. (Akashvani Job)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संगणकाचे वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान असणे गरजेचे आहे.पुणे येथील आकाशवाणी केंद्रावर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवार अर्ज arnupune@gmai.com या ई मेल आयडीवर पाठवू शकता.तसेच ऑफलाइन पद्धतीने प्रादेशिक वृत्त विभाग, आकाशवाणी, शिवाजीनगर, पुणे ४११००५ येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टेबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. (Government Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT