Airport Jobs Saam Tv
naukri-job-news

Airport Jobs: एअरपोर्टवर नोकरीचा चान्स; पात्रता फक्त १०वी पास; पगार किती? जाणून घ्या सविस्तर

Airport Job Recruitment 2024: एअरपोर्टमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. १०वी आणि १२वी पास उमेदवार एअरपोर्टवरील नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी अनेक तरुणांची इच्छा असते. सध्या एअरपोर्टवर नोकरीची सुवर्णसंधी आहे. ग्लोबल एविएशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडने एअरपोर्ट फ्रेशर ग्राउंट स्टाफमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

एअरपोर्टवरील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १३ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२४ आहे. यासाठी तुम्ही अभ्यर्थी नॅशनल करिअर सेक्शन (NCS)वर जाऊन अर्ज करु शकतात. (Airport Jobs 2024)

ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी करिअरची सुरुवात करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. एअरपोर्ट ग्राउंड स्टाफमध्ये पॅसेंजर हँडलिंग स्टाफ, कार्गो सुपरवायजर, युटिलिटी, तिकीट हँडलिंग स्टाफ, लोडर या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १०वी आणि १२ वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

एअरपोर्टवरील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३४ वर्ष असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २०,००० ते ३८,००० रुपये मानधन दिले जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. (Airport Recruitment)

ग्लोबल एविएशन सर्व्हिसेसच्या या भरतीमध्ये नॅशनल करियर सर्व्हिसच्या पोर्टलवर जाऊन अर्ज करु शकतात. ही मुलाखत कोलकत्ता येथे होणार आहे. या नोकरीबाबत अधिक माहिती नॅशनल करिअर सर्व्हिस या पोर्टलवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT