AIIMS Recruitment 2025 Application 
naukri-job-news

AIIMS Recruitment 2025: AIIMS मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी , 4576 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

AIIMS Recruitment: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) नवी दिल्ली यांनी सामाईक भरती परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केलीय. या भरतीमध्ये नर्सिंग ऑफिसर, हॉस्पिटल अटेंडंट आणि मल्टी-टास्किंग स्टाफ या पदांचा समावेश आहे.

Bharat Jadhav

अखिल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) नवी दिल्ली यांनी सामाईक भरती परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती परीक्षा 2025 साठी घेतली जात आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करत असलेले उमेदवार 31 जानेवारी 2025 पर्यंत येथे अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये नर्सिंग ऑफिसर, हॉस्पिटल अटेंडंट आणि मल्टी-टास्किंग स्टाफ या पदांचा समावेश आहे.

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि उमेदवार AIIMS च्या अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी तुमची माहिती भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरावी. ही परीक्षा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या एम्स आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांमधील नियुक्तीसाठी घेतली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय.

अर्ज शुल्क

सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 3000 रुपये भरावे लागतील. तर SC, ST आणि EWS श्रेणीसाठी 2400 रुपये अर्ज शुल्क असणार आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे फी भरली जाऊ शकते. अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.

एकूण पदांची संख्या

AIIMS ने या भरती प्रक्रियेअंतर्गत ४५५७ पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यात नर्सिंग ऑफिसर, पब्लिक हेल्थ नर्स, वरिष्ठ नर्सिंग ऑफिसर, ड्रेसर, हॉस्पिटल अटेंडंट, मल्टी-टास्किंग स्टाफ आणि इतर पदांचा समावेश आहे.

असा असेल परीक्षा नमुना

परीक्षेत १०० बहुपर्यायी प्रश्न असतील.

बरोबर उत्तरासाठी ४ गुण मिळतील, तर चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील.

परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल.

पात्रता मार्क सामान्य आणि EWS साठी ४०%, OBC साठी ३५% आणि SC-ST साठी ३०% निश्चित करण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रिया

एम्सच्या वेबसाइटला भेट द्या.

तुमची माहिती जसे की नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरून नोंदणी करा.

नोंदणीनंतर प्राप्त झालेल्या आयडीसह लॉगिन करा आणि अर्ज भरा.

आवश्यक कागदपत्रे, फोटो, स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा अपलोड करा.

फी भरून अर्ज सबमिट करा.

फॉर्मची प्रिंटआउट काढून तु्मच्याकडे ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

SCROLL FOR NEXT