AIIMS Recruitment SAAM TV
naukri-job-news

AIIMS Job: एम्समध्ये सरकारी नोकरी अन् ६७७०० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या

AIIMS Recruitment: सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एम्स येथे १२३ पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजेच एम्समध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एम्स बिलासपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे. सीनियर रेजिडेंट पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

एम्स बिलासपूरमध्ये शिक्षकेतर कर्मचारी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्ही aiimsbilaspur.edu.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (Government Job)

एम्समधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया ( MCI)मधून एमडी/ एमएस / डीएनबी यामध्ये ग्रॅज्युएट पदवी प्राप्त केलेली असावी.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १७ ते ४५ या वयोगटातील असावी.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ११८० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५९० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे. ५६,१०० ते ६७,७०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत अन्य भत्ते दिले जाणार आहेत. (AIIMS Recruitment)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. इंटरव्ह्यूला जाताना शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो घेऊन जायचे आहे.याबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वर्धा - आर्वी मार्गावरील पहाटेच्या सुमारास मोठा अपघात, पायदळ जाणारा व्यक्ती गंभीर जखमी

EPFO ची महत्त्वाची अपडेट! १५ मे पूर्वी 'हे' काम पूर्ण करा; अन्यथा PF आणि पेन्शनवर होईल परिणाम

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! कार ३०० फूट खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू

Heart Attack Signs : हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देते 'हे' ५ संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात

पंतप्रधान मोदी म्हणाले सोनं खरेदी करू नका, राहुल गांधी भडकले; म्हणाले आता देश चालवणे...

SCROLL FOR NEXT