AAI Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

AAI Recruitment: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये सरकारी नोकरी; ३०९ रिक्त जागा; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

AAI Recruitment 2025: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ३०९ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी (AAI Recruitment) करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह एअर ट्राफिक कंट्रोल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्ही aai.aero या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २५ एप्रिलपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे आहे. या भरती मोहिमेत एकूण ३०९ पदे भरली जणार आहेत. जर तुम्हाला चांगल्या कंपनीत नोकरी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे.

पात्रता

जर तुम्हालाही एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी (Airport Authority Of India) करायची असेल तर तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc फिजिक्स अँड मॅथ्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत B.E./B.Tech पदवी प्राप्त केलेली असावी.

एअरपोर्ट ऑथोरिटीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा२७ वर्षे असावी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, व्हॉइस टेस्ट, मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे.

अर्ज कसा करावा?(How To Apply)

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला aai.aero या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर करिअर सेक्शनवर जा.त्यात JE ATC 2025 भरती लिंकवर क्लिक करा. यानंतर फॉर्म भरुन सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

SCROLL FOR NEXT