AAdhaar UIDAI Recruitment  Saam Tv
naukri-job-news

Aadhaar मध्ये नोकरी करण्याची संधी; UIDAI ने भरती काढली; पगार १,१२,४०० रुपये; आताच अर्ज करा

AAdhaar UIDAI Recruitment 2025: यूआयडीएआयमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. आधारमध्ये सध्या असिस्टंट सेक्शन ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरी शोधत असाल तर ही बातमी वाचा. आधार कार्ड बनवणारी कंपनी म्हणजेच UIDAI मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणामध्ये नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणमध्ये (UIDAI Recruitment) असिस्टंट सेक्शन ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला uidai.gov.in या वेबसाइटवर मिळेल. तुम्ही अधिसूचना वाचून अर्ज करावेत.

UIDAI मधील ही भरती राज्य कार्यालय भोपाळसाठी होणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २६ मे २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अजून तुमच्याकडे दीड महिन्याचा कालावधी आहे.

आधारमधील (Aadhaar Recruitment) ही भरती परराष्ट्र सेवा नियमांनुसार प्रतिनियुक्ती आधारावर केली जाणार आहे. केंद्र सरकारी अधिकारी जे सध्या त्याच पदावर काम करत आहेत. किंवा लेव्हल ३, ४ आणि लेव्हल ५ पदांवर किमान ७, ५ किंवा ३ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. याशिवाय राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, सरकारी उपक्रम, स्वायत्त संस्थेचे अधिकारी जे त्यात पदासाठी काम करत आहे. असे उमेदवारही अर्ज करु शकतात.

सहाय्यक विभाग अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा कमी असावे. या उमेदवारांना लेव्हल ६ नुसार दर महिन्याला ३५,४०० ते १,१२,४०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज संचालक (एचआर), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, तळमजला, सर्वोच्च न्यायलय मेट्रो स्टेशन, प्रगती मैदान, नवी दिल्ली ११०००१ येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT