Zoho founder Sridhar Vembu announces new hiring model offering jobs without a degree. saam tv
देश विदेश

Zoho Jobs: नोकरीसाठी डिग्रीची गरज नाही, झोहो IT कंपनीची नवी ऑफर

Zoho Announces Jobs: चांगल्या नोकरीसाठी किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. मात्र तुमच्याजवळ पदवी नाही. तर मग नोकरी कशी मिळणार ?अशा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका.. कारण एका आयटी कंपनीने तरुणांना पदवीशिवाय नोकरीची ऑफर दिली आहे. पाहूया कोणाची ही संकल्पना आहे.

Snehil Shivaji

  • झोहो कंपनीची पदवीशिवाय नोकरी देण्याची अनोखी ऑफर

  • तरुणांसाठी उच्च पगाराच्या आयटी नोकरीची मोठी संधी

  • सहसंस्थापक श्रीधर वेंबू यांनी कौशल्याधारित भरतीची बाजू मांडली.

सध्या कुठलीही नोकरी मिळवण्यासाठी दहावी-बारावी पासचा निकष केव्हाच इतिहासजमा झालाय. आता चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची असेल तर संबंधित क्षेत्रातील पदवी असणं अनिवार्य झालंय. पण तुम्हाला गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवायची असेल तर तीही तुम्हाला पदवी शिवाय मिळणारेय. होय कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आता जगातील प्रतिष्ठित आयटी कंपनीच्या सहसंस्थापक श्रीधर वेंबूनीचं तसं आवाहन केलंय. आपल्या ट्विटमध्ये ते काय म्हणतायेत पाहा.

पदवीशिवाय नोकरी?

Zohoमध्ये नोकरीसाठी कॉलेजची पदवी आवश्यक नाही

कंपनी व्यवस्थापकांना पदवीची अट जाहिरातीतून काढण्याच्या सूचना

हुशार अमेरिकन विद्यार्थी आता कॉलेजमध्ये जात नाहीत

मोठ्या कर्जाशिवाय तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करणं शक्य

पालकांनी या बदलत्या नोकरीच्या दृष्टिकोनाकडे लक्ष द्यावं

इतकी मोठी घोषणा करतांना वेंबू यांना तेनकासीमध्ये त्यांनी 19 वर्षांच्या वयोगटातील तांत्रिक टीमसोबत काम केल्याचा अनुभव सांगितला. म्हणून त्यांनी औपचारिक पदवीपेक्षा कौशल्ये, क्षमता आणि प्रत्यक्ष कामाच्या अनुभवावर जोर देत इतर कंपन्यांना देखिल या सांस्कृतिक बदलात सहभागी होण्याचं आवाहन केलंय.

मात्र बदलत्या काळासाठी वेंबू यांचा हा फक्त सल्ला आहे वेंबू हे खुद्द पदवीधर इलेक्ट्रीकल इंजिनिअर असून त्यांनी मास्टर्स आणि डॉक्टरेट पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे हे फक्त आवाहन असून त्यांनी हा विचार मांडलाय. पदवी न करता इतर कुठेही नोकरी मिळेल असा ठोस निर्णय अद्याप झालेला नाही त्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळवायची असेल तर पदवीचं शिक्षण घ्यावच लागणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : खोटे शिक्के घेतले, कागदपत्रे तयार केली; पुणे महापालिका आणि बँकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराला बेड्या

Tulsi Leaves Face Pack: थंडीत मऊ आणि चमकदार त्वचेसाठी तुळशीच्या पानांचा फेसपॅक कसा बनवायचा?

Dhurandhar Collection : बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा बोलबाला; 'धुरंधर'नं पहिल्याच दिवशी 'सैयारा', 'पद्मावत'ला पछाडलं, कमाई किती?

Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १० प्रेरणादायी विचार

Dr Babasaheb Aambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनापूर्वीच्या २४ तासांत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT