Dhruv Rathee Released After 20 Hours | Serious Allegations Against Police 
देश विदेश

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

YouTuber Dhruv Rathee : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी देशभरात वातावरण तापलंय. त्यातच आंदोलनात कुठेही सहभागी नसलेल्या युट्युबर ध्रुव राठींनाही अटक करण्यात आली. मात्र, सुटकेनंतर राठींनी पोलिसांवर गंभीर आरोप केलाय. तसंच, परदेशी नागरिक म्हणणाऱ्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट

Rohit Kadam

  • ध्रुव राठी यांची 20 तासांनंतर सुटका

  • सुटकेनंतर त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केल्याचे सांगितले.

  • परदेशी नागरिक असल्याच्या दाव्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिल्याचे वृत्त

CJPच्या प्रमुख नेत्यांसह प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठींनाही शनिवारी सकाळी पोलिसांनी घरातून अटक केली. गुरुग्राममधील घरातून ताब्यात घेतल्यानंतर ध्रुव राठींना अज्ञातस्थळी ठेवण्यात आलं. मात्र, तब्बल 20 तासांनंतर पोलिसांनी युट्युबर ध्रुव राठींची शनिवारी रात्री उशिरा सुटका केली. मात्र, या सुटकेनंतर ध्रुव राठींनी एक व्हिडिओ पोस्ट केला असून पोलिसांवर गंभीर आरोप केलाय. पोलिसांनी ताब्यात नव्हे तर घरात घुसून अपहरण केल्याचा दावा ध्रुव राठींनी केलाय.

विशेष म्हणजे शनिवारी कोणत्याही आंदोलनात किंवा मोर्चात सहभागी नसतानाही पोलिसांनी थेट घरात घुसून कारवाई का केली असा सवालही राठींनी उपस्थि केलाय. ध्रुव राठींवर परदेशी नागरिक असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे त्यांना भारतात आंदोलन करण्याचा अधिकार नसल्याची टीका होतेय. मात्र या आरोपांनाही ध्रुव राठींना प्रत्युत्तर दिलंय.

ध्रुव राठींची सुटका केल्यानंतर त्यांना पोलिसांनी आंदोलनाला न जाण्याच्या सूचना केल्यात. खरंतर, ध्रुव राठी बंगळुरुतील आंदोलनासाठी जर्मनीतून भारतात दाखल झाले होते. मात्र, दिल्लीतल्या आंदोलनात सहभागी होण्याआधीच राठींवर पोलिसांच्या कारवाईनं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: राजापूरमध्ये खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू; एका मुलीला वाचवण्यात यश

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

SCROLL FOR NEXT