YouTuber Devraj Patel Dies In Road Accident  Saam Tv
देश विदेश

YouTuber Devraj Patel: 'दिल से बुरा लगता है', कॉमेडियन देवराजचा रस्ते अपघातात मृत्यू

'दिल से बुरा लगता है', कॉमेडियन देवराजचा रस्ते अपघातात मृत्यू

Satish Kengar

YouTuber Devraj Patel Dies In Road Accident: छत्तीसगडमधील प्रसिद्ध यूट्यूब कॉमेडियन देवराज पटेल यांचा आज रस्ते अपघातात मृत्यू झाला. अनियंत्रित भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात YouTuber देवराज पटेल याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रायपूरच्या तेलीबंधा पोलीस स्टेशन परिसरात घडली.

“दिल से बुरा लगता है” त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. यानंतर त्याने आपल्या युट्यूब चॅनलचे नाव देवराज पटेल हे बदलून 'दिल से बुरा लगता है', हे केलं होत. देवराज याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं आहे.

काही दिवसांपूर्वी युट्युबर देवराज पटेल याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या भेटीदरम्यान एक व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये देवराज म्हणतो की, छत्तीसगडमध्ये फक्त दोनच लोक प्रसिद्ध आहेत, एक मी आणि एक मोर काका. यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना हसू अनावर झाले.  (Latest Political News)

देवराज पटेल याने मृत्यूच्या चार तास आधी एक व्हिडीओ बनवून पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये त्याने सर्वांना अलविदा म्हटले आहे. देवराज पटेलने 2021 मध्ये प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम सोबत कॉमेडी ड्रामा वेब सिरीज धिंडोरा मध्ये काम केलं होतं.

त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून लिहिले आहेकी, "दिल से बुरा लगता है" द्वारे आम्हा सर्वांना हसवणारे आणि कोट्यवधी लोकांमध्ये आपले स्थान निर्माण करणारे देवराज पटेल आज आपल्याला सोडून गेले.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VP Election : मोदींचा राहुल गांधींना मोठा झटका, इंडिया आघाडीची १५ मते फुटली, राजधानीत मोठ्या घडामोडी

Success Story: सरकारी नोकरी करत दिली UPSC; पाचव्या प्रयत्नात झाल्या IPS; मोहिता शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Pune : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, रात्री ११ वाजता मावळ हादरलं, नेमकं काय घडलं?

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT