Lata Adhikari Youtuber Saam tv
देश विदेश

Lata Adhikari Youtuber: धक्कादायक! युट्यूब चॅनलला सब्सक्राइबर्स कमी झाले, युट्यूबरने उचललं टोकाचं पाऊल

देहरादूनच्या ठाणे पटेल नगरच्या चंद्रबानी येथील युट्यूबर लता अधिकारीच्या आत्महत्येचं वृत्त समोर आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lata Adhikari Youtuber News: देहरादूनमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. देहरादूनच्या ठाणे पटेल नगरच्या चंद्रबानी येथील युट्यूबर लता अधिकारीच्या आत्महत्येचं वृत्त समोर आलं आहे. लता अधिकारीच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

देहरादूनच्या युट्यूबर लता अधिकारीने जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. लता अधिकारी देहरादूनच्या चंद्रबानी येथे राहत होती. अधिकारीचा मृतदेह तिच्याच राहत्या घरात आढळला.

युट्यूबर लता अधिकारी आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. प्राथमिक दृष्टीने लता अधिकारीने आत्महत्या केल्यांचं मानलं जात आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणत्याही प्रकारची चिठ्ठी सापडलेली नाही. लता अधिकारीचे वय २२ होते. लताने बीकॉम पर्यंतचे शिक्षण केलं होतं.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, शनिवारी सकाळी लता अधिकारी घराच्या बाहेर दिसली नाही, त्यामुळे घरातल्या सदस्यांना संशय येऊ लागला. घरातले सदस्य लता उठविण्यास गेले. त्यावेळी तिच्या खोलीतून कोणाचाही आवाज आला नाही. घरातील सदस्यांनी दरवाजा ठोठावला तरी लताने आवाज दिला नाही.

त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी खिडकी खोलून बघितलं, तर लताचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

लताचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लता अधिकारीचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणा पुढील तपास सुरू केला आहे. युट्यूबर लता अधिकारी चॅनलचे सब्सक्राईबर्स कमी झाल्याने चिंतेत होती. तसेच तिचा युट्यूब चॅनल देखील व्यवस्थित चालत नव्हता. त्यात चॅनलचे फॉलोवर्समध्ये घट होऊ लागली होती, या नैराश्यातून लताने टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

Pune News: अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: भोंदूबाबाला अटक झाल्याच्या दिवशीच, पत्नीच्या नावावर जमीन; व्यवहारावर संशय

SCROLL FOR NEXT