भोपाळ रेल्वे स्टेशनवर भीषण अपघात
धावती ट्रेन पकडताना तरुण पडला
५ सेकंद ट्रेनसोबत फरफटत गेला
या अपघातात तरुण गंभीर जखमी
सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल
मध्य प्रदेशच्या भोपाळ रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात झाला. धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तरुण गंभीर जखमी झाला. ३१ मार्चच्या रात्री घडलेल्या या घटनेचा १४ सेकंदांचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहे. धावत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध हा तरुण अडकतो आणि खाली जातो. या भयंकर अपघातामध्ये तरुण एक तरुण गंभीर जखमी झाला. या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्लॅटफॉर्मवरून ट्रेन जात असते आणि एक तरुण ही धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतो. ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा हात सटकतो आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधोमध अडकतो. यावेळी हा तरुण जवळपास चार ते पाच वेळा गोल गोल फिरत ट्रेनखाली जातो. ५ सेकंद हा तरूण ट्रेनसोबत फरफटत जातो. ही संपूर्ण घटना पाहून प्लॅटफॉर्मवर असलेल्या प्रवाशांचाही थरकाप उडतो.
ही घटना भोपाळ रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर घडली. या रेल्वे अपघातामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. रेल्वे कर्मचारी आणि जवळचे प्रवासी तात्काळ या तरुणाच्या मदतीसाठी धावले. त्या तरुणाला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधून कसेबसे बाहेर काढण्यात आले आणि त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
या तरुणाचा एक हात तुटला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, धावत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे अत्यंत धोकादायक असून प्रवाशांनी असा निष्काळजीपणा टाळावा. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून तो पाहून नेटकऱ्यांनाचाही थरकाप उडाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.