देश विदेश

Viral Video: तरुणाचा किंग कोब्रासोबत डान्स, जीव मुठीत धरुन अनेकांनी पाहिलाय व्हिडीओ

सापाचा एक दंश आणि तरुणाचा खेळ खल्लास... अशी स्थिती असताना तरुण सापासोबत डान्स करताना दिसतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साप म्हटलं की अनेकांचा थरकाप उडतो. साप किती विषारी आहे यापेक्षा तो दिसताच अनेकांना त्याची भीती वाटते. त्यात तो किंग कोबरा असेल तर विषयच संपला. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे (Viral Video) साप जणू खेळणं आहे की काय असं तुम्हाला वाटेल. भला मोठा किंग कोबरा आणि एक तरुण समोर समोर आहेत. तरुण सापाच्या काही सेंटीमीटर अंतरावर त्याला पकडून डोळ्यात डोळे घालून बसलाय. सापाचा एक दंश आणि तरुणाचा खेळ खल्लास... अशी स्थिती असताना तरुण सापासोबत डान्स करताना दिसतोय.

किंग कोबरा अत्यंत विषारी सापांपैकी (Snake) एक मानला जातो. त्यांच्या त्याचा दंश इतका विषारी असतो की व्यक्ती पाणी मागेपर्यंतही जीवंत राहत नाही. मात्र व्हायरल व्हिडीओतील तरुण किंग कोबरा नाही तर यमदूतासोबत डान्स करताना दिसतोय असंच म्हणावं लागेल. या व्हिडीओत तरुण आधी सापाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. त्याच्या जवळ दोन लहान मुलंही उभी आहेत. यावेळी तरुण ज्या स्टाईनले सापासोबत डान्स करत आहे त्यावरुन लोक त्याला सनकी बोलत आहेत. मात्र एवढ्या विषारी सापासमोर असून देखील तरुणाच्या चेहऱ्यावर किंचितही भीती दिसत नाही.

किंग कोबराने एक दंश जरी या तरुणाला केला असता तर आता त्याला श्रद्धांजली देण्याची वेळ सर्वांवर आली असती. मात्र सुदैवाने किंग कोबराने कोणताही हल्ला केला नाही म्हणून कोणतीही अनुचित घटना घडली नाही. तरुणाचा कोबारा सोबतचा डान्स व्हिडीओ earth.reel नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या तरुणाला नेमकं काय सिद्ध करायचंय? असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओवर अनेकांना समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT