Delhi News Saam Tv
देश विदेश

मालकीणीने नोकरासोबत थाटला संसार, आंधळ्या प्रेमाची कहाणी वाचून तुम्हालाही बसेल धक्का

प्रेम कधीही कुणावरही होऊ शकतं. याचाच प्रत्यय एका प्रकरणातून आला आहे. २० वर्षीय तरुण मालकिणीचं आपल्या नोकरावर प्रेम जडलं.

Satish Daud

नवी दिल्ली : प्रेम हे आंधळं असतं असं नेहमी म्हटलं जातं. प्रेमात जात पात, वय तसेच वर्ण बघितल्या जात नाही. प्रेम कधीही कुणावरही होऊ शकतं. याचाच प्रत्यय एका प्रकरणातून आला आहे. २० वर्षीय तरुण मालकिणीचं आपल्या नोकरावर प्रेम जडलं, दोघांमधील अंतर हळूहळू कमी होतं गेलं. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला की त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा प्रकार पाकिस्तानातील सिंध प्रांतातून समोर आला आहे. आमिर आणि मुस्कान असं या प्रेमीयुगुलाचं नाव आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आमिर हा मुस्कानच्या घरी नोकर म्हणून कामाला होता. तो ४ म्हशींची देखभाल करत होता. आमिर पूर्ण इमानदारीने काम करायचा तसेच तो नियमित कामावर यायचा.

केवळ आमिरचा हा प्रामाणिकपणा आणि समर्पण मुस्कानच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्यामुळे मुस्कानला आमिर आवडू लागला. मात्र, आमिरला प्रपोज करायची मुस्कानची हिंमत होत नव्हती. कारण, आमिर हा गरीब होता. तरीसुद्धा एकेदिवशी तिने हिंमत एकवटून आपले प्रेम व्यक्त केले.

मुस्कान त्याच्याजवळ आली आणि तिने तिच्याकडे आपले प्रेम व्यक्त केले. तिने आमिरला सांगितले की ती त्याच्या प्रेमात पडली आहे आणि तिला लग्न करायचे आहे. हे ऐकून आमिरला धक्काच बसला. मात्र, त्यांनी मुस्कानकडे संध्याकाळपर्यंतची वेळ मागितली.

दरम्यान, कुटुंबीयांशी बोलून आमिरने मुस्कानचा प्रस्ताव स्वीकारला. रिपोर्ट्सनुसार आता दोघेही लग्नानंतर खूप खुश आहेत. मुस्कानने सांगितले की, आता म्हशींची काळजी घेण्यासाठी तीन लोकांना कामावर ठेवण्यात आलं आहे. मुस्कानच्या आई-वडिलांनी सुद्धा दोघांनाही स्वीकारलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनात धनंजय मुंडे भेटीसाठी दाखल

Surya Gochar 2026: नवरात्रीत 5 राशींच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट! काम-धंद्यात अडचणी, प्रेमातही वाढणार तणाव

Pune Fort : महाराष्ट्रातील 'हा' किल्ला सतरंगी मातीमुळे प्रसिद्ध, पठारावर दिसतो निसर्गाचा चमत्कार

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

CJP च्या आंदोलनादरम्यान धक्कादायक घटना; आंदोलनकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT