Yogi Adityanath Saam Tv News
देश विदेश

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी, आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

आजपासून उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे.

वृत्तसंस्था

लखनऊ - योगी आदित्यनाथ यांची गुरुवारी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड झाली असून आज ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.आजपासून उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. राजधानी लखनऊमध्ये (Lucknow) आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून इकाना क्रिकेट स्टेडियम पूर्णपणे सजवण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता शपथविधी सोहळा सुरू होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप प्रमुख जेपी नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेते, उद्योगपतींसह हजारो पाहुणे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपचे विद्यमान आणि माजी मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बॉलीवूड स्टार अक्षय कुमार, कंगना रणौत आणि बोनी कपूर यांना देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर नुकताच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या टीमलाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मैदानावर 20 हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. यूपीमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत आले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला ४१.२९ टक्के मते मिळाली आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT