Yemen Charity Event Stampede  screenshot
देश विदेश

Yemen Charity Event: पैसे वाटपाच्या कार्यक्रमात लोकांमध्ये चेंगराचेंगरी! ७८ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

Yemen Charity Event 78 Killed: पैसे वाटपाच्या कार्यक्रमात गोंधळ उडून झालेल्या चेंगराचेंगरीत ७८ लोकांना जीव गमवावा लागला.

Chandrakant Jagtap

Yemen Charity Event Stampede : येमेनची राजधानी साना येथे एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ७८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात व्यवसायिक लोकांना आर्थिक मदत म्हणून पैशांची वाटप करत होते. या ठिकाणी गरजू लोकांनी मोठी गर्दी केली होती.

या पैसे वाटपाच्या कार्यक्रमात गोंधळ उडून झालेल्या चेंगराचेंगरीत ७८ लोकांना जीव गमवावा लागला, तसेच अनेक जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या घटनेनंतर कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या दोन व्यावसायिकांना हुथी बंडखोरांनी ताब्यात घेतले आहे. या कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बंडखोरांचे ब्रिगेडियर अब्देल खलीक अल अघरी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचं आयोजन एका शाळेत करण्यात आले होते. या घटनेनंतर ती शाळा तात्काळ बंद करण्यात आली आहे. तसेच पत्रकारांना या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी जमली होती. त्यामुळे जमावाला नियंत्रित करण्यासाठी सशस्त्र हुती बंडखोरांनी हवेत गोळीबार केला. (Yemen News)

या घटनेत एका विजेच्या तारेला गोळी लागली आणि त्यामुळे स्फोट झाला आणि लोक घाबरले. त्यामुळे भितीपोटी लोकांनी धावपळ सुरू केली. यावेळी मोठी गर्दी असल्याने लोकांमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली अशी माहिती प्रत्यक्षदर्शी अब्देल रहमान अहमद आणि याहिया मोहसीन यांनी दिली. (Latest Marathi News)

कोण आहेत हुती बंडखोर?

हुथी बंडखोरांचा उदय 1980 च्या दशकात झाला. येमेनच्या उत्तरेकडील प्रदेशात शिया इस्लामच्या एका शाखेने झायदिझमची आदिवासी संघटना स्थापन केली. सुन्नी इस्लामच्या सलाफी विचारसरणीच्या विस्ताराला हुथी बंडखोरांचा विरोध आहे. येमेनमध्ये सुन्नी नेते अब्दुल्ला सालेह यांचे सरकार असताना शिया लोकांवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.

स्वतःचे सैन्य तयार केले

सालेहच्या आर्थिक धोरणांमुळे उत्तर येमेनमध्ये असमानता वाढली असा हुथींचा विश्वास होता. हुथींनी २००च्या दशकात स्वतःचे सैन्य तयार केले. २००४ ते २०१० दरम्यान हुथी बंडखोरांनी सालेहच्या सैन्याशी ६ वेळा युद्ध केले. यानंतर २०१४ मध्ये हुथी बंडखोरांनी अबेद रब्बो मन्सूर हादी यांना सत्तेवरून हटवले आणि राजधानी सना ताब्यात घेतली. त्यामुळे सौदी अरेबिया आणि यूएई घाबरले. त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनच्या मदतीने युती केली. ही युती हुथींवर हल्ला करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT