Omicron In Delhi: सी.एम. केजरीवालांनी केले नवे निर्बंध जाहीर, म्हणाले, गर्दी दिसल्यास... Saam Tv
देश विदेश

Omicron in Delhi: सी.एम. केजरीवालांनी केले नवे निर्बंध जाहीर, म्हणाले, गर्दी दिसल्यास...

कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा (Omicron Variant) धोका लक्षात घेता दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत GRAP (ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन) लागू करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi : कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा (Omicron Variant) धोका लक्षात घेता दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत GRAP (ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन) लागू करण्यात आला आहे. म्हणजेच आता दिल्लीत यलो अलर्ट (GRAP Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. यामध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (delhi news today)

रिपोर्टनुसार, देशभरात ओमिक्रॉनची एकूण 653 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 165 फक्त दिल्लीत (Delhi) आहेत. दिल्लीच्या केजरीवाल सरकारने (Arvind Kejriwal) जुलै 2021 मध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी GRAP तयार केला होता. त्याअंतर्गत दिल्लीत लॉकडाऊन कधी लागू होणार, काय बंद राहणार आणि कधी उघडणार, याबाबतच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या होत्या.

GRAP अंतर्गत लादण्यात आलेल्या निर्बंधांचा परिणाम शाळा, मेट्रो, बस सेवा तसेच जिम, बँक्वेट हॉलवर होतो. दिल्ली सरकारने आज मंगळवारी GRAP अंतर्गत 'यलो अलर्ट' लागू केला, लवकरच अतिरिक्त कोविड-संबंधित निर्बंध लादले जातील, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राजधानीत कोविड पॉझिटिव्ह दर ०.५% पेक्षा जास्त आहे, म्हणून त्यांनी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनचा 'यलो अलर्ट' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल पुढे म्हणाले, “अंमलबजावणीच्या निर्बंधांबाबतचा तपशीलवार आदेश लवकरच जारी केला जाईल.

दिल्लीत यलो अलर्ट लागू झाल्यावर कोणते निर्बंध लागू होतील ?

- रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्र कर्फ्यू लागू असेल

- वीकेंड कर्फ्यू लागू होणार नाही- सम-विषम नियमानुसार, अत्यावश्यक सेवा किंवा वस्तू असलेली दुकाने आणि मॉल्स सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत उघडतील

- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि कोचिंग संस्था बंद राहतील- बांधकाम सुरू राहील, उद्योग सुरू राहतील

- सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत रेस्टॉरंट्स 50% क्षमतेने उघडतील- दुपारी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत बार देखील 50% क्षमतेने उघडतील

- सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्स बंद राहतील

- बँक्वेट हॉल, प्रेक्षागृहे बंद राहतील - हॉटेल्स खुली राहतील, हॉटेलमधील बँक्वेट्स आणि कॉन्फरन्स हॉल बंद राहतील

- सलून आणि ब्युटी पार्लर खुले राहतील - स्पा, जिम, योग संस्था आणि मनोरंजन उद्याने बंद राहतील

- आउटडोअर योगास परवानगी - दिल्ली मेट्रो 50% आसनक्षमतेसह धावेल, उभ्याने प्रवास करण्याची परवानगी नाही - एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बसेस 50% आसनक्षमतेने धावतील

- ऑटो, ई रिक्षा, फक्त 2 प्रवाशांना परवानगी आहे टॅक्सी आणि सायकल रिक्षाने प्रवास करण्यासाठी

- क्रीडा संकुल, स्टेडियम आणि जलतरण तलाव बंद राहतील. तथापि, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ आयोजित केले जाऊ शकतात

- सार्वजनिक उद्याने खुली राहतील

- केवळ 20 लोकांना लग्न समारंभ आणि अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल - सामाजिक, राजकीय, धार्मिक, सण आणि मनोरंजन संबंधित क्रियाकलापांवर बंदी घालण्यात आली आहे (अद्याप सुरू आहे)धार्मिक स्थळे खुली राहतील , पण भाविकांना प्रवेश प्रतिबंधित असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT