Breaking |UP | उत्तर प्रदेशातील धर्मांतर रॅकेट चे यवतमाळ कनेक्शन! SaamTvNews
देश विदेश

Breaking |UP | उत्तर प्रदेशातील धर्मांतर रॅकेट चे यवतमाळ कनेक्शन!

या कटात "इस्लामिक यूथ फाउंडेशन" या ग्रुपचाही धीरज मेंबर आहे. तरुणांना किंवा नागरिकांना मदत करत असल्याचे भासवून किंवा ब्लॅकमेल करूनही धर्मांतर करत असल्याचे समोर आले आहे.

सूरज सावंत

मुंबई : उत्तर प्रदेशाताल (Uttar Pradesh) धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (ATS) ने यवतमाळहून धीरज (Yavatmal) जगताप उर्फ गोविंद राव याला अटक केली आहे. धीरज हा यवतमाळ जिल्ह्यात पटवारी सोसायटीत रहातो. उत्तरप्रदेश एटीएसने या प्रकरणात विविध राज्यातून आतापर्यंत १४ जणांना अटक (Arrest) केली आहे.

हे देखील पहा :

या प्रकरणात या पूर्वीच रामेश्वर कावडे उर्फ आदम याला यूपी एटीएसने अटक केलेली असताना. धीरज जगताप याचाही या प्रकरणात सहभाग निश्चित झाल्यानंतर एटीएसनेही कारवाई केली आहे. धीरजने १० वर्षापूर्वी धर्मांतर केले. त्यानंतर तोही या धर्मांतर (Conversion) कटात सहभागी झाला. तपासात त्याच्या मोबाइलमध्ये (Mobile) तीन Whatsapp ग्रुपही यासंबधित असल्याचे समोर आले आहे.

या व्हाट्स ऍप ग्रुपच्या माध्यमातून धीरज दोन समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज व व्हिडिओ (Video) टाकायचा. तसेच तरुणांना विविध आमीष दाखवून त्यांना धर्मांतर करण्यासाठी परावृत्त करायचा. या कटात "इस्लामिक यूथ फाउंडेशन" या ग्रुपचाही धीरज मेंबर आहे. तरुणांना किंवा नागरिकांना मदत करत असल्याचे भासवून किंवा ब्लॅकमेल करूनही धर्मांतर करत असल्याचे समोर आले आहे.

धीरज हा या कटातील आरोपी प्रकाश कांवरे याच्यासोबत धर्मांतर करणाऱ्या तरुणांचे किंवा नागिकांचे बनावट कागदपत्रही बनवायचा. या कागदपत्रांची खरी नोंद करण्यासाठी त्याने वकिलाचीही नियुक्ती केली होती. प्रकाश आणि धीरज यांनी नोकरीचे आमीष दाखवून काही तरुणाचे धर्मांतर केल्याचा संशय यूपी एटीएसला आहे. नुकतीच धीरजला यूपी एटीएसने कानपूरहून अटक केली असून उद्या न्यायालयात (Court) हजर केले जाणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कालव्यातील पाण्याची नासाडी

5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

Hair Fall: केसगळती आणि केस तुटण्याची समस्या होईल कमी; आठवड्यातून २ वेळा लावा हे घरी बनवा खास तेल

Navratri Fasting Recipe : नवरात्रीत उपवासाला गोड खाण्याची मजाच वेगळी, 'असा' बनवा मऊसूत रताळ्याचा शिरा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

SCROLL FOR NEXT