Yamuna Expressway fire accident news :  ANI
देश विदेश

Expressway Accident : हायवेवर पहाटे काळाचा घाला, ७ बसे अन् ३ कार जळून खाक, ७ जणांचा जळून मृत्यू, २५ गंभीर जखमी

Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेसवेवर दाट धुक्यामुळे सात बसेस आणि तीन कारची भीषण धडक होऊन आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Yamuna Expressway fire accident news : उत्तर प्रदेशातील मथुरेत पहाटे भयंकर अपघात झालाय. सात बसेस अन् ३ कारचा विचित्र अपघात झाल्याने आगीचा भडका उडाला. या अपघातात ७ जणांचा जळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातामध्ये २५ जण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. यमुना एक्सप्रेसवेवर दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.

उत्तरेकडे सध्या थंडीचा कडाका वाढलाय. दाट धुक्यामुळे आज पहाटे यमुना एक्सप्रेसवेवर काळाने घाला घातला. दोन वाहनांची एकमेंकाना जोरात धडक झाली. त्यानंतर मागे असणाऱ्या इतर काही गाड्याही धडकल्या. यामध्ये सात बस आणि तीन कार जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत सहा ते सात जणांचा जळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. आतापर्यंत ४ जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. दुर्घटनेत २५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे.

अपघातानंतर बसेस अन् कारला आग लागल्यानंतर घटनास्थळी आरडाओरडा आणि किंचाळ्याने परिसर हादरला होता. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू केले. मथुरा जिल्हा अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेत ४ जणांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. घटनास्थळावर अद्याप बचावकार्य सुरू आहे. अपघातानंतर ब्लॉक केलेला महामार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी आणि अडकलेल्या प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास दाट धुक्यामुळे यमुना एक्सप्रेसवेवर सात बसेस आणि तीन कार यांची जोरात धडक झाली अन् आगीचा भडका उडाला. पहाटेची वेळ असल्याने बहुतेक प्रवासी झोपेत होते. कोणालाही काही समजण्यापूर्वीच आग भडकली अन् त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. सहा ते सात जण जिवंत जळाल्याचे वृत्त आहे. स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडून चार जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लोकल प्रवास होणार गर्दी मुक्त, आता १८ डब्यांची उपनगरीय रेल्वे धावणार

Maharashtra Live News Update: १० दिवसांत भाजपला सोडचिठ्ठी, माजी आमदार नितीन भोसले यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश

BMC Election : आयोगाचा भाजपला जोरदार धक्का, ऐन निवडणुकीत परवानगी नाकारली

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹३००० ऐवजी ₹१५०० आले, आता डिसेंबरचा हप्ता का रखडला? महत्त्वाची माहिती समोर

Tilgul Poli Recipe : मकर संक्रांतीला फक्त १० मिनिटांत बनवा मऊसूत 'तीळ गुळाची पोळी', वाचा पारंपरिक रेसिपी

SCROLL FOR NEXT