Brazilian Nun Sister Inah Canabarro Died Saam Tv
देश विदेश

Worlds Oldest Women: जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन, ब्राझिलियन ननने ११६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Brazilian Nun Sister Inah Canabarro: जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन झाले. ब्राझिलियन नन इना कॅनाबारो लुकास यांनी वयाच्या ११६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला.

Priya More

जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती असलेल्या ब्राझिलियन नन इना कॅनाबारो लुकास यांचे निधन झाले. सिस्टर इना कॅनाबारो यांचे बुधवारी ३० एप्रिल रोजी निधन झाले. वयाच्या ११६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही आठवड्यातच त्या ११७ वर्षांच्या होणार होत्या. पण त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या धार्मिक संघटनेने गुरुवारी त्यांच्या निधनाचे वृत्त जाहीर केले.

टेरेसियन नन कम्युनिटी, कंपनी ऑफ सेंट टेरेसा ऑफ जीझसने म्हटले आहे की, 'सिस्टर कॅनाबारो यांचे त्याच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार गुरुवारी पोर्तो अलेग्रे येथे केले गेले.' सिस्टर इना कॅनाबारो यांचा जन्म १९०८ मध्ये झाला होता.

जानेवारीमध्ये जगभरातील १०० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा मागोवा घेणाऱ्या लॉन्गेव्हिटीक्वेस्ट या संस्थेने सिस्टर इना कॅनाबारो यांचे नाव जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती म्हणून घोषित केले होते. त्यांचा जन्म ८ जून १९०८ मध्ये झाला होता आणि २७ मे रोजी त्या ११७ वर्षांच्या होणार होत्या. पण त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला. जानेवारीमध्ये जपानी महिला टोमिको इटूका यांचेही वयाच्या ११६ व्या वर्षी निधन झाले होते.

फेब्रुवारी २०२४ मध्ये लॉन्गेव्हिटीक्वेस्टने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये सिस्टर इना कॅनाबारो यांनी म्हटले होते की, त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य त्याचा कॅथोलिक विश्वास आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी हसत हसत अनेक विनोद सांगितले होते. त्यांच्या ८४ वर्षांच्या पुतण्याने सांगितले की, 'ती लहान असताना इतकी बारीक होती की लोकांना विश्वासच बसत नव्हता की ती इतकी वर्षे जगेल.'

सिस्टर इना कॅनाबारोचे पणजोबा एक प्रसिद्ध ब्राझिलियन सेनापती होते. किशोरावस्थेत त्यांनी धार्मिक सेवेचा मार्ग निवडला. एक समर्पित शिक्षिका म्हणून त्यांनी आयुष्यभर सर्वांना शिकवले. त्यांनी ब्राझीलचे शेवटचे लष्करी हुकूमशहा जनरल जोआओ फिगुएरेडो यांना शिकवले होते. २०२३ मध्ये ११८ व्या वर्षी निधन झालेल्या फ्रान्सच्या लुसिल रँडन यांच्यानंतर ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वृद्ध नन होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Tourism: उल्हासनगरपासून अवघ्या ८४ किमी अंतरार वसलंय 'हे' शांत आणि थंडगार ठिकाण; आजच प्लान करा

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनरनं २० गाड्यांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू, VIDEO समोर

Shocking : लग्न करण्यास नकार दिल्याने हत्या, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरला विष देऊन संपवलं

Periods and Shravan : मासिक पाळीत श्रावणाचा उपवास करावा की नाही?, जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT