World Population in 2050: Saam TV
देश विदेश

Population in 2050: जगात २०५० पर्यंत लोकसंख्येतील २०० कोटी लोक होणार वयोवृद्ध; युवकांना मिळणार रोजगाराच्या नव्या संधी

World Population in 2050 | ज्येष्ठांवर संशोधन करणारे डेव्हिन कोयालिन यांच्यानुसार सध्या एकाच वेळी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदल होतात, त्यामुळे त्यांच्या देखभालीची जास्त गरज आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद: येत्या २०५० पर्यंत जगभरात जवळपास २०० कोटी लोक ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) असतील असा अंदाज आहे. मात्र, नोकरी (Jobs) करणाऱ्या कुटुंबाकडे वेळ नसल्यानं आगामी दिवसांत ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करण्यासाठीचा नव्या करिअरचा एक पर्याय उभा राहणार असल्याचं समोर आलंय. (Old Age Population in 2050)

हे देखील पाहा -

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार २०५० पर्यंत जगात जवळपास २०० कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. यामध्ये आशिया खंड अव्वल क्रमांकावर असेल. अमेरिकन सायक्लोजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार, १९७० मध्ये केवळ अमेरिकेतच ६५ वर्षांवरील ४० लाख ज्येष्ठ मानसिक समस्येशी झगडत होते. २०३० मध्ये ही संख्या दीड कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांवर संशोधन करणारे डेव्हिन कोयालिन यांच्यानुसार सध्या एकाच वेळी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदल होतात, त्यामुळे त्यांच्या देखभालीची जास्त गरज आहे.

कुटुंबातील ज्येष्ठांची देखभाल आगामी काळात रोजगाराचे नवे क्षेत्र सुरू करेल आणि प्रशिक्षणानंतर व्यावसायिक लोक यात येतील. ज्येष्ठांना जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा सर्वांत आधी आपल्या कुटुंबाकडून ती बाळगली जाते. यातून त्यांना भावनिकदृष्ट्या बळकटी येते.

काय असेल हे भावनिक करिअर :

- देखभालीसाठी आखणी करणे.

- घ्यावयाच्या काळजीची यादी बनवून त्यांच्या तब्येतीबाबत अपडेट राहणे.

- आपले वित्तीय नियोजन शेअर करणे, त्यांचे मेडिकल रिपोर्ट तुमच्याकडे ठेवणे,

- इमर्जन्सी कॉन्टेक्ट्स स्वतःकडे ठेवणे, ज्येष्ठांच्या आवडीच्या गोष्टी आणणे, त्यांच्या नावडत्या गोष्टींची यादी बनवणे.

- त्यांच्या जुन्या मित्रांची भेट घडवणे, नवे मित्र करण्यासाठी प्रेरित करणे

- ज्येष्ठांसोबत फॅमिली चॉकवर जाणे, त्यांच्यासोबत चेस, लुडो खेळणे.

- चित्रपटाची आवड असेल तर सोबत पाहणे.

मनाने जवळ जाऊन ठिकाणातील अंतर कमी करणे गरजेचे आहे. सध्या रोजगारासाठी बहुतेकांचा आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांपासून लांब राहण्याचा नाइलाज झाला आहे. आई-वडिलांना आपले घर सोडून तुमच्यासोबत राहायला सोयीस्कर वाटत नाही. जिथे आयुष्याची अनेक वर्षे घालवली तेथून अन्यत्र राहणे त्यांच्यासाठी त्रासदायक असते. अशा स्थितीत त्यांच्यासोबत काही वेळ घालणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात हे करिअर म्हणून पाहिले जाईल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT