Work From Home Job Scam News Saamtv
देश विदेश

Job Scam: बाबो, हा तर सर्वात खतरनाक स्कॅम! एकाचवेळी 'ती' तब्बल १६ कंपन्यांमध्ये काम करायची, घरी बसून घेतला पगार; अखेर...

Work From Home Job Scam: काही लोक पैशासाठी असे काही मार्ग निवडतात, ज्याचा शेवट थेट तुरूंगात होतो, असाच एक चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे.

Gangappa Pujari

China Women Job Fraud: पैसा! प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग. पैसा मिळवण्यासाठी प्रत्येकजण विविध मार्ग निवडत असतो. काही लोक पैशासाठी असे काही मार्ग निवडतात, ज्याचा शेवट थेट तुरूंगात होतो. पैशासाठी या लोकांची कोणत्याही थराला जायची तयारी असते. असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. (Working 16 Componies Together)

काय आहे प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या चीनमधील एका महिलेच्या फसवणूकीची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. या महिलेने एकाचवेळी १६ कंपन्यांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. कोरोना काळात वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळाल्यानंतर ही महिला एकाचवेळी तब्बल १६ कंपन्यांमध्ये काम करत होती.

एकाचवेळी १६ कंपन्यात काम...

चीनमधील स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, गुआन युई असे या महिलेचे नाव आहे. ही महिला तब्बल तीन वर्ष १६ कंपन्यांमध्ये काम करत होती. कधीही ऑफिसला न जाता तिने यामधून रग्गड पैसाही कमावला. मात्र एका नोकरीच्या मुलाखतीवेळी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

असा झाला पर्दाफाश....

एका मुलाखतीवेळी ही महिला फोटो क्लिक करत होती. तिने ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या चॅट ग्रुपवर शेअर करत क्लाईंटसोबत मिटींग करत असल्याचे सांगितले, मात्र तिची चोरी पकडली गेली. जानेवारी २०२३ मध्ये एका कंपनीचे मालक असलेल्या लियु जियान यांना या महिलेच्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आली.

त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलीस तपासात या महिलेची अनेक बॅंक खाती असल्याचे आढळून आले. तसेच तिच्या खात्यात पगाराच्या स्वरुपात भरपुर पैसाही येत असल्याचे समोर आले. या महिलेच्या पतीसह मोठी टोळी हे काम करत असल्याचे समोर आले. सध्या या टोळीमधील ५३ जणांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने हालू लागल्या बिल्डिंग, घरातील सर्व वस्तू पडल्या; नागरिकांचा जीव मुठीत; पाहा थरकाप उडवणारे VIDEO

Saiyaara worldwide collection : 'सैयारा' सुसाट! बॉक्स ऑफिसवर जादू कायम, वर्ल्डवाइड कलेक्शन 400 कोटींपार

Silent heart attack risk: सायलेंट हार्ट अटॅकपूर्वी शरीरात होतात हे बदल; कोणाला असतो जास्त धोका, जाणून घ्या

Maharashtra Live News Update: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून आणखी ६१,१४६ महिलांचे अर्ज बाद, तुमचं नाव नाही ना?

SCROLL FOR NEXT