Viral Video : प्रवास करताना ट्रेन असो अथवा बस प्रत्येक प्रवाशी बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी मोठी धडपड करत असतो. बस येताच प्रवाशांची मोठी धावपळ सुरू होते. बसमध्ये जागा पकडतानाचे आजवर अनेक फनी व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अशात आता देखील सोशल मीडियावर बसमध्ये जागेवरून महिलांच्या भांडणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Viral Video)
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बसमध्ये जागा पकडण्यावरून दोन महिला एकमेकींशी भिडल्या आहेत. जागेवरून त्यांचे जंगी भांडण सुरू आहे. महिलांचे लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडिओ आजवर व्हायरल झाले आहेत. यातील काही व्हिडिओमध्ये महिला एकमेकींचे केस ओढून देखील हाणामारी करत आहेत. अशात सध्या व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये देखील महिलांची जंगी हाणामारी सुरु असल्याचे दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला सिटवर बसलेल्या दुसऱ्या महिलेशी सुरुवातीला व्यवस्थीत बोलण्याचा प्रयत्न करते. सीटवर बसलेल्या महिलेच्या शेजारी आणखी एक पुरुष बसलेला असतो. पुरुष ज्या सीटवर बसलेला आहे ती महिलांसाठी राखीव सीट आहे. त्यामुळे उभी असलेली महिला त्या व्यक्तीला तेथून उठण्यास सांगते. मात्र त्याच्यासह असलेली महिला उभ्या असलेल्या महिलेशी थेट वरच्या स्वरात ओरडून भांडायला सुरुवात करते.
सदर व्हिडिओ हा दिल्ली येथील आहे. महिला एकमेकींशी जोरजोरात भांडू लागल्यावर इतर प्रवाशी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र या दोन्ही महिला एकमेकींशी हाणामारी करण्यास सुरूवात करतात. उभी असलेली महिला काही वेळाने थेट बसलेल्या महिलेच्या अंगावर बसून घेते. त्यानंतर महिलेच्या शेजारी बसलेला माणून उभा राहतो आणि दोन्ही महिलांना बसण्यासाठी जागा दिली जाते.
सुमिती चौधरी या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आजपर्यंत १ मिलीअनहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. ३ मिनीट ५९ सेकंदाच्या या व्हिडिओवर ३ हजारांहून अधिक व्यक्तींनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. काहींनी यावर खळखळून हसण्याचे इमोजी पाठवले आहेत. तर काहींनी महिलेच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला चांगलेच खडेबोल सुणावले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.