Excessive straining during bowel movement led to temporary memory loss in a shocking medical case. saam tv
देश विदेश

टॉयलेटमध्ये गेली, जोरात कुंथल्यानं बेशुद्ध; स्मरणशक्तीच गमावली, १० वर्षांतील घटना विसरली, डॉक्टर चक्रावले

Woman Loses 10 Years Memory After Toilet Strain: शौचाच्या वेळी जास्त जोर लावल्यामुळे एका महिलेला अचानक १० वर्षांची स्मृती गमवावी लागली. डॉक्टरांनी ट्रान्झिएंट ग्लोबल अम्नेशिया असल्याचे सांगितले असून ही घटना आरोग्यासाठी गंभीर इशारा आहे.

Omkar Sonawane

शौचाला जाणे ही एक अत्यंत सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण कधीकधी ही क्रिया जीवावर बेतू शकते किंवा आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करू शकते. हाँगकाँगमध्ये एका महिलेसोबत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या महिलेने शौचाच्या वेळी जास्त जोर लावल्यामुळे ती गेल्या 10 वर्षातले सगळे विसरली असून तिची स्मरणशक्ति नाहीशी झाली.

महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या आईला गेल्या दोन आठवड्यांपासून बद्धकोष्ठतेचा त्रास होता. एके दिवशी जेव्हा ती टॉयलेटला बसली, तेव्हा तिने शोचासाठी खूप जोर लावला. या प्रक्रियेनंतर बाहेर आल्यावर तिला गेल्या 10 वर्षातील काहीच आठवत नव्हते. हे पाहून कुटुंबही हादरले आणि त्यांनी तिला तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यावर समोर आले की, महिलेची स्मृति तात्पुरती नाहीशी झाली आहे. सुमारे 8 तास ती आपल्या आयुष्यातील गेल्या 10 वर्षांतील एकही गोष्ट आठवू शकत नव्हती. सुदैवाने 8 तासानंतर तिची स्मृती हळूहळू परत आली. मात्र त्या 8 तासांत नक्की काय झाले, हे तिला आजही आठवत नाही.

डॉक्टरांनी काय सांगितले?

वैद्यकीय भाषेत या स्थितीला ट्रान्झिएंट ग्लोबल अम्नेशिया (Transient Global Amnesia - TGA) असे म्हणतात.

रक्तप्रवाहात अडथळा: शौचाच्या वेळी अतिशय जोर लावल्यामुळे छाती आणि पोटावर प्रचंड दाब निर्माण होतो. यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाह तात्पुरता प्रवाह थांबू शकतो.

ऑक्सिजनची कमतरता: मेंदूला होणारा रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा प्रवाह काही सेकंदांसाठी विस्कळीत झाल्याने स्मृतीवर परिणाम होतो.

नसांवर ताण: बद्धकोष्ठतेमुळे अतिप्रमाणात जोर लावल्यास मेंदूच्या नसांवर ताण येतो, ज्यामुळे अशी स्थिती उद्भवू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT