woman hypnotized and robbed video  Saam TV
देश विदेश

Shocking News : भररस्त्यात महिलेला हिप्नोटाइज करून ४ लाखांचे दागिने लुटले; चोरट्यांच्या कारनाम्याचा VIDEO व्हायरल

Woman hypnotized Video : पतीला जेवणाचा डबा देऊन घरी परतणाऱ्या महिलेला दोन अज्ञात आरोपींनी भररस्त्यात अडवलं. यानंतर एका आरोपीने महिलेला हिप्नोटाइज केलं. काही वेळानंतर महिलेचं भान हरपलं. पुढे काय घडलं, वाचा...

Satish Daud

पतीला जेवणाचा डबा देऊन घरी परतणाऱ्या महिलेला दोन अज्ञात आरोपींनी भररस्त्यात अडवलं. वेगवेगळे प्रश्न विचारत तिला बोलण्यात अडकून ठेवलं. यानंतर एका आरोपीने महिलेला हिप्नोटाइज केलं. काही वेळानंतर महिलेचं भान हरपलं. त्यानंतर आरोपी जे काही सांगत होते, तशाच प्रकारे महिला करत राहिली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

आरोपींनी भररस्त्यात महिलेला हिप्नोटाइज करून सोने-चांदीचे दागिने आणि मोबाइल, असा साडेचार लाखांचा मुद्देमाला घेऊन पळ काढला आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना राजस्थानमधील उदयपूर शहरात घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय.

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूर शहरात राहणारी फिर्यादी महिला आपल्या पतीला जेवणाचा डबा घेऊन त्यांच्या ऑफिसात गेली होती. तेथून परतत असताना तिला दोन अज्ञात व्यक्ती भेटले.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, घराकडे परतत असताना रस्त्यात दोन व्यक्तींनी तिला अडवलं. तुम्ही मथुरेला गेला होता का? असा प्रश्न आरोपींनी तिला विचारला. यावर महिलेने नकार दिला. यानंतर गुंडांनी तिला विचारले की, तुम्ही ती कोणत्या देवावर विश्वास ठेवतात. माझा भगवान महावीर स्वामींवर विश्वास आहे, असं महिलेने आरोपींना सांगितलं.

जवळपास ७ मिनिटे आरोपींनी महिलेला अशा प्रकारची प्रश्न विचारत गुंतवून ठेवलं. त्यानंतर तिला हिप्नोटाईज करून तिच्या अंगावरील सोने-चांदीचे दागिने तसेच पर्समधून मोबाइल घेऊन पळ काढला. जेव्हा महिलेला शुद्धीवर आली, तेव्हा तिला अंगावरील दागिने चोरी गेल्याचं समजलं. ही बाब लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणी अपडेट, केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या अडचणी वाढणार? चेंडू थेट पंतप्रधानांच्या कोर्टात

Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसाने हाहाकार; वादळी वाऱ्याने कोसळले पोस्टर

Maharashtra Government : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मच्छीमारांना मिळणार वीज सवलत, फक्त ठेवली महत्वाची अट

Maharashtra Live News Update: पनवेलमधील पळस्पेफाटा येतील दुकानाला लागली आग

खोबरं काढणं आता सोप्पं! साऊथस्टाईल १ सोपी टीप; सेकंदात फुटेल नारळ

SCROLL FOR NEXT