Women Funny Dance Video Saam TV
देश विदेश

Funny Video : नाचताना इतका जोश चढला की महिला कुणालाही आवरेना; VIDEO पाहून पोट धरून हसाल

एका महिला अगदी बेभान नाचताना दिसत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Women Funny Dance Video : गाणं लागलं की अनेकांचे हातपाय थिरकू लागतात. विशेषत: डीजे वाजू लागला की कित्येकांच्या अंगातच येतं. मात्र, नाचता-नाचता काही जण इतके आऊट ऑफ कंट्रोल होतात, की आपण काय करतोय याचं त्यांना भानही राहत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एका महिला अगदी बेभान नाचताना दिसत आहेत. (Women Dance Video)

व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहू शकता की ढोल ताशांचा गजर सुरू आहे. त्यावर काही महिला आणि मुली नाचताना दिसत आहे. यामध्ये निळ्या रंगाची साडी नेसलेल्या महिलेकडे तुम्ही नीट पाहा. ही महिला अगदी बेभान होऊन नाचते आहे. नाचण्यात ती इतकी दंग झाली आहे की आजूबाजूला असलेल्या लोकांकडेही तिचं लक्ष नाही.

सुरूवातीला या महिलेसोबत इतर महिलाही नाचत असतात. मात्र या महिलेचं नाचणं बघून त्या बाजूला होतात. ही महिला एवढा खतरनाक डान्स करत आहे की तिचं नाचणं बघून एक वयोवृद्ध महिला तिथे येते. कदाचित ही महिला नाचणाऱ्या महिलेची नातेवाईक असेल. (Women Funny Dance Video)

वयोवृद्ध महिला नाचणाऱ्या महिलेला आवर घालण्याचा प्रयत्न करताना दिसते. मात्र तरीही नाचणारी महिला काही ऐकण्याच्या तयारीत नाही. त्यानंतर एक व्यक्ती सुद्धा या महिलेला आवर घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण सर्वांनाच न जुमानत ही महिला अगदी बेभानपणे नाचते आहे.

ही महिला कधी नागीण डान्स करू लागते तर कधी विचित्र गोष्टी करायला लागते. महिलेचा असा विचित्र आणि संतापजनक नृत्य क्वचितच कुणी कधी केला नसेल किंवा पाहिला नसेल. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT