Crime Saam Tv
देश विदेश

Congress: 'निवडणुकीचे तिकीट देतो, हॉटेलमध्ये ये' काँग्रेस महिला कार्यकर्त्यावर सामूहिक बलात्कार

Congress Worker physical assault in Jaipur Accused Booked: जयपूरमध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यावर नगरसेवकाचे तिकीट मिळवून देण्याच्या आमिषाने सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Bhagyashree Kamble

जयपूरमधून एक संतापजनक घटना समोर येत आहे. एका महिला काँग्रेस कार्यकर्त्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आगामी निवडणुकीत नगरसेवकाचे तिकीट मिळवून देण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला, तसेच आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली.

सिंधी कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ३५ वर्षीय पीडित महिला बऱ्याच काळापासून काँग्रेस पक्षासाठी काम करत आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेची ओळख बबलू नावाच्या व्यक्तीशी झाली. त्या व्यक्तीची पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध होते.

पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं की, ९ एप्रिल रोजी, बबलू या व्यक्तीने त्या पीडित महिलेला जयपूर रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतलं. महिला ७:३० वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. तेव्हा हॉटेलमध्ये बबलूसोबत वसीम आणि मुन्ना नावाचे दोन व्यक्तीही होते. बबलूने त्यावेळी एका काँग्रेस आमदाराला फोन केला आणि तिकीटासाठी विचारणा केली. मात्र, आमदार व्यस्त असल्यामुळे त्यांनी फोन कट केला.

यानंतर बबलूने पीडित महिलेला हॉटेलमध्ये राहण्यास सांगितले. नंतर तिघांनी एकत्र जेवण केले. आरोपीने महिलेच्या जेवणात नशेच्या गोळ्या मिसळल्या. नंतर महिला बेशुद्ध पडली. बेशुद्ध बेडवर पडल्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी महिलेला शुद्ध आल्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला धमकी दिली.

मात्र, पीडित महिला घाबरली नाही. तिने थेट सिंधी कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत तिन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस तिघांचा शोध घेत आहे. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT