News Delhi : केस कापताना चूक झाली; तब्बल दोन कोटींची भरपाई दिली! SaamTvNews
देश विदेश

News Delhi : केस कापताना चूक झाली; तब्बल दोन कोटींची भरपाई द्यावी लागली!

दिल्लीमध्ये एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेचे केस कापताना सलून कर्मचाऱ्यांकडून चूक झाल्याने तब्बल दोन कोटी रुपयांची भरपाई सलून मालकाला संबंधित महिलेस द्यावी लागली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेचे केस कापताना सलून कर्मचाऱ्यांकडून चूक झाल्याने तब्बल दोन कोटी रुपयांची भरपाई सलून मालकाला संबंधित महिलेस द्यावी लागली आहे. दिल्लीमधील हॉटेल आयटीसी मौर्य (Hotel ITC Maurya) येथील सलूनमध्ये २०१८ साली तक्रारदार महिलेचे चुकीच्या पद्धतीने केस कापले होते. चुकीचे केस कापल्याबद्दल आणि सलूनमध्ये योग्य वागणूक न दिल्याने सदर महिलेस राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (National Consumer Disputes Redressal Commission) दोन कोटी रुपयांची भरपाई मिळवून दिली आहे.

एवढी मोठी रक्कम भरपाईसाठी देण्यात येत असेल तर प्रकरण देखील तितकेच मोठे आहे. तसं पाहायला गेलं तर, महिला आपल्या केसांबाबत अत्यंत काळजीवाहू आणि भावनिकही असतात. तक्रारदार महिला ही हेअर प्रोडक्टसाठीची (Hair Products) मॉडेल होती. तिने VLCC आणि पॅन्टीन सारख्या प्रोडक्टसाठीही मॉडेलिंग केले आहे. आपल्या लांबलचक केसांमुळे ती हेअर प्रोडक्टसाठी मॉडेलिंग करत होती. १२ एप्रिल २०१८ रोजी या महिलेने हॉटेल आयटीसी मौर्य मधील सलूनला भेट दिली. तिला नेहमीप्रमाणे हेअरकट करायचा होता. हा सलूनमध्ये, या महिलेचे नेहमी केस कपणाऱ्या स्टायलिशननेच केस कापावे असेही त्या ठिकाणी सांगितले होते. मात्र, तो स्टायलिशन त्या दिवशी तिथे उपस्थित नव्हता. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीने तिचा हेअरकट केला.

हे देखील पहा :

12 एप्रिल 2018 रोजी या महिलेनं हॉटेल आयटीसी मौर्य येथील सलूनला भेट दिली. तिला रेग्यूलर हेअरकट करायचा होता. तिनं आपल्या नेहमीच्या स्टायलिशनंच माझा हेअरकट करावा असंही सांगितलं. मात्र, त्यावेळी तो तिथे उपस्थित नसल्यानं स्टाफमधील दुसऱ्या स्टायलिशनं महिलेचा हेअरकट केला. महिलेच्या तक्रारीनुसार, ज्या हेअरस्टायलिशनने तिचे केस कापले होते, त्याला या महिलेने खालच्या बाजूनं केवळ 4 इंचच सरळ केस कापण्यास सांगितले होते. परंतु, जेव्हा तिने आरशात पहिले तेव्हा तिच्या डोक्यावर चार इंचापेक्षाही कमी केस होते. या प्रकारामुळे महिलेला धक्का बसला.

तक्रारीत महिलेने सांगितले की, मला लांब केस ठेवायची सवय असताना त्या स्टायलिशनने माझ्या डोक्यावर चार इंचापेक्षाही कमी केस ठेवले होते. त्यामुळे मी मानसिकरित्या पूर्णतः खचले होते. मी आरशात पाहणे सोडून दिले होते. माझा आत्मविश्वास देखील या काळात पूर्णपणे ढासळला होता. त्यामुळे मीटिंग आणि माझ्या इतर कामांकडेही माझे दुर्लक्ष झाले होते. सलूनकडून तिला ट्रिटमेंटची ऑफर देखील देण्यात आली होती, मात्र,या ट्रीटमेंटमध्ये तिच्या केसांचं नुकसान झालं.

केसांच्या या ट्रीटमेंटमुळे तिच्या टाळूवर प्रचंड वेदना होऊ लागल्या आणि डोक्यात खाज सुटू लागली. केमिकल वापरून केलेल्या ट्रीटमेंटमुळे तिच्या टाळूला कायमची दुखापत झाली होती. याच कारणामुळे महिलेला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं आणि तिची नोकरी सुद्धा गेली होती. तिने या बाबत तक्रार केल्यांनतर, या प्रकरणावर आर.के.अग्रवाल आणि एस.एम.कानटीकार यांनी निर्णय सुनावला आहे. त्यांनी म्हटलं, की महिला आपल्या केसांबाबत अतिशय संवेदनशील असतात आणि आपले केस चांगले राहावे, यासाठी त्या खूप प्रयत्न करत असतात. त्यामुळे, या महिलेसाठी देखील तिचे केस खूप महत्त्वाचे होते. मात्र, सलून कडून झालेल्या एका चुकीमुळे तिला आपले लांब केस कापावे लागले आणि यामुळे तिचे बरेच नुकसान झाले. तसेच भविष्यात टॉपची मॉडेल बनण्याचे तिचे स्वप्नही भंगले असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT