Shocking x
देश विदेश

Shocking : भयंकर! ट्रेनमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; ट्रॅकवर फेकल्यानंतर पीडितेच्या पायावरून गेली एक्स्प्रेस

Shocking News : एका महिलेला फसवून ट्रेनच्या रिकाम्या डब्ब्यात नेण्यात आले. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिला रेल्वेरुळावर फेकून दिले. पायावरुन ट्रेन गेल्याने महिलेचा पाय निकामी झाला.

Yash Shirke

Crime News : २४ जून रोजी बेपत्ता झालेली ३५ वर्षीय महिला हरियाणातील सोनीपत येथे रेल्वे रुळांवर आढळली. या महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला, त्यानंतर तिला रेल्वेच्या रुळावर फेकून देण्यात आले. रेल्वे रुळात पाय अडकला आणि त्यावरुन ट्रेन गेल्याने महिलेचा पाय कापला गेला. या महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महिलेच्या पतीने २६ जून रोजी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. माझी पत्नी याआधीही घरातून रागाच्या भरात बाहेर पडली आहे. सहसा राग शांत झाल्यावर ती स्वतःहून घरी परतते. पण यावेळेस ती घरी आली नाहीये, असे महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध सुरु केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात घरातून बाहेर पडल्यानंतर महिला जवळच्या रेल्वे स्थानकावर गेली होती. तेथे एका व्यक्तीने तिच्याशी संवाद साधला, मला तुमच्या पतीने मला पाठवले आहे, असे त्या व्यक्तीने महिलेला सांगितले. महिला त्या व्यक्तीसोबत गेली. थांबलेल्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात तो व्यक्ती चढला, त्याच्यापाठोपाठ पीडित महिला देखील चढली.

ट्रेनच्या रिकाम्या डब्यात पीडितेवर त्याने बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोनजण त्याच्यासोबत आले आणि त्यांनीही महिलेवर बलात्कार केला. सोनीपत येथे तिघांनी पीडित महिलेला रेल्वे रुळांवर फेकून दिले. तिच्या शरीरावरुन ट्रेन गेली. या अपघातात महिलेने पाय गमावला. सोनीपत रेल्वे रुळाजवळील दुकानदारांना महिलेचा आवाज ऐकू आला. ते महिलेच्या मदतीला धावले. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, रेल्वे ट्रॅकच्या स्विचमध्ये अडकल्याने महिलेचा पाय कापला गेला होता. महिलेला उपचारांसाठी सोनीपत जनरल हॉस्पिटलमधून रोहतक पीजीआय येथे पाठवण्यात आले आहे.

सामूहिक बलात्काराचा झिरो एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आणि पुढील कारवाईसाठी एफआयआर पानीपत सरकारी रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) पाठवला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेनंतर सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची आणि त्यानंतर घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT