Palm Oil Price Hike News Updates Saam Tv
देश विदेश

तेलाच्या किमती पुन्हा वाढणार! इंडोनेशियाची पाम तेल निर्यातीवर बंदी

पाम तेलाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे.

वृत्तसंस्था

इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ही बंदी 28 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो (Joko Widodo) यांनी शुक्रवारी स्वयंपाकाचे तेल (Cooking Oil) आणि कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली. देशांतर्गत कुकिंग ऑइलच्या किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर इंडोनेशियाने हे पाऊल उचलले आहे. (Palm Oil Price Hike News Updates)

जोको विडोडो यांनी सांगितलं;

देशांतर्गत स्तरावर खाद्यपदार्थांची (Food Products) उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे विडोडो यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "देशात स्वयंपाकाच्या तेलाची पुरेशी उपलब्धता आणि अफोर्डेबिलिटी सुनिश्चित करण्यासाठी मी या धोरणाच्या अंमलबजावणीचे निरीक्षण आणि मूल्यमापन करणार आहे."

अमेरिकेतही वाढले भाव;
इंडोनेशियाच्या बंदीनंतर अमेरिकेच्या सोया तेलाच्या भावी भावात (Future Price) तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. 84.03 सेंट प्रति पौंडवर किंमत पोहोचली आहे.

भारतावरही पडणार प्रभाव;

अतुल चतुर्वेदी, अध्यक्ष, सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) म्हणाले, "या निर्णयामुळे भारतातील सर्वात मोठ्या खरेदीदारावर तसेच इतर बाजारपेठांवर परिणाम होईल कारण पाम तेल हे जगातील सर्वात जास्त वापरण्यात येणारे तेल आहे. हे पाऊल खरोखरच पूर्णपणे अनपेक्षित होते," असे त्यांनी बोलताना सांगितले.

हे देखील पाहा-

इंडोनेशिया आणि मलेशिया सारख्या सर्वात मोठ्या उत्पादक देशांमधील उत्पादन कमी झाल्याने पाम तेलाच्या किमती यावर्षी ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत. यापूर्वी जानेवारीमध्येही इंडोनेशियाने पामतेलाच्या निर्यातीवर निर्बंध लादले होते. त्याचा परिणामही दिसून आला. मात्र, नंतर इंडोनेशियाकडून हे निर्बंध उठवण्यात आले होते.

दरम्यान, रुसो-युक्रेन (Russia Ukraine War) युद्धामुळे जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या बाजारात तेजी आली आहे. याचे कारण रशिया-युक्रेन हा प्रदेश सूर्यफूल तेलाच्या निर्यातीसाठी ओळखला जातो. युद्धामुळे त्याच्या शिपमेंटवर परिणाम झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT