Kamal Nath Political Career Saam Tv
देश विदेश

Kamal Nath Political Career : काँग्रेसच्या पराभवासोबतच कमलनाथ यांचा राजकीय प्रवास थांबणार? 77 व्या वर्षी मुख्यमंत्री व्हायचं होतं स्वप्न

Madhya Pradesh Assembly Election Results : काँग्रेसच्या पराभवासोबतच कमलनाथ यांचा राजकीय प्रवास थांबणार? 77 व्या वर्षी मुख्यमंत्री व्हायचं होतं स्वप्न

Satish Kengar

Madhya Pradesh Assembly Election Results :

देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यामध्ये तीन राज्यात भाजपने भगवा फडकवला आहे. तर काँग्रेसने एका राज्यात विजय मिळवला आहे. यातच मध्य प्रदेशातील पराभवामुळे झाल्याने काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांची राजकीय इनिंग जवळपास संपुष्टात येताना दिसत आहे.

या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याची ही त्यांची शेवटची संधी होती. वयाच्या 77 व्या वर्षी मुख्यमंत्री बनण्याचे ते स्वप्न पाहत होते. दुर्दैवाने त्यांचं हे स्वप्न भंगलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उत्तर प्रदेशात जन्म, कोलकाता येथून पदवी प्राप्त

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे 18 नोव्हेंबर 1946 रोजी जन्मलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचे शालेय शिक्षण उत्तराखंड (अविभाजित उत्तर प्रदेशचा भाग) येथील डेहराडून येथून झाले. यानंतर कमलनाथ यांनी सेंट झेवियर, कोलकाता येथून बी.कॉम केले. त्यानंतर 1968 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला. कमलनाथ 1970 ते 1981 पर्यंत सुमारे 11 वर्षे अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य होते. दरम्यान, 1976 मध्ये त्यांच्याकडे उत्तर प्रदेश युवक काँग्रेसची धुराही आली. 1979 मध्ये ते युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे निरीक्षक होते. (Latest Marathi News)

नऊ वेळा लोकसभेचे खासदार आणि पाच वेळा केंद्रात मंत्री

यानंतर 1979 मध्ये ते पहिल्यांदा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर ते 1984, 1990, 1991, 1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा भागही राहिले आहेत. दरम्यान, कमलनाथ 1991 ते 1994 पर्यंत केंद्राचे वन आणि पर्यावरण मंत्री, 1995 ते 1996 पर्यंत वस्त्रोद्योग मंत्री आणि 2004 ते 2008 पर्यंत वाणिज्य आणि उद्योग मंत्री होते. 2009 ते 2011 पर्यंत त्यांनी रस्ते आणि वाहतूक मंत्रालय, तर 2012 ते 2014 पर्यंत त्यांनी नगरविकास आणि संसदीय कामकाज मंत्रीपद भूषवले.

600 हून अधिक वेळा परदेश प्रवास

कमलनाथ यांनी 1982 ते 2018 पर्यंत 600 हून अधिक वेळा परदेश दौरे केले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेपासून ते आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदांपर्यंत जगातील बहुतेक देशांमध्ये भाग घेतला. याशिवाय, ते 2000 ते 2018 पर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस होते. तर सध्या ते मध्य प्रदेश प्रदेश काँग्रेस कमिटीचे (PCC) अध्यक्ष आहेत. 2006 मध्ये कमलनाथ यांना जबलपूरच्या राणी दुर्गावती विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT