dog viral video
dog viral video  saam tv
देश विदेश

Viral Video : विषारी साप आणि पाळीव कुत्र्याची जीवघेणी झुंज; व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या काळजाचा उडतोय थरकाप

Vishal Gangurde

Dog and Snake Viral Video News : साप प्रचंड विषारी प्राणी आहे. सापाचं विष माणसांसहित प्राण्यांनाही माणसांनाही अत्यंत घातक आहे. यामुळे प्राणी किंवा माणसं विषारी सापापासून दूरच राहतात. सापांवर प्रेम करणारे क्वचित माणसं आढळून येतील. मुंगूस प्राणी सोडला तर कोणत्याही प्राण्याची सापासोबत क्वचित झुंज पाहिली असेल. मात्र, सोशल मीडियावर पाळीव कुत्र्याचा आणि विषारी सापाच्या जीवघेणी झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

इन्स्टाग्रामवर (Instagram) A.F.Ranch नावाच्या अंकाऊटने पाळीव कुत्रा आणि सापाच्या झुंजीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कुत्र्याने विषारी सापावर हल्ला करत त्याचा जीवच घेतला आहे. पाळीव कुत्र्याने सर्वात आधी तोंडाने एका वाहनातून त्याला बाहेर काढलं. त्यानंतर तोडांने सापाला जोरानं जमिनीवर आपटण्यास सुरुवात केली. सातत्याने आपटल्यामुळे काही वेळातच या सापाचा जीवच गेला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडत आहे.

नेमकं काय घडलं ?

पाळीव कुत्रा आणि विषारी सापाची झुंज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने वाहनातील सापाला काठीने इंजिनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, साप बाहेर निघाला नाही. त्यानंतर पाळीव कुत्र्याने तोंडाने सापाला इंजिनमधून बाहेर काढलं. त्यानंतर कुत्र्याने सापाला जमिनीवर आपटायला सुरुवात केली. सातत्याने आपटल्यामुळे सापाचा जीवच गेला.

दरम्यान, अनेक कुत्रे हे सापापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकांना पाळीव कुत्र्याची भयानक झुंज पाहून आश्चर्याचा धक्का बसत आहे. हा विषारी साप कुत्र्याला चावला असता तर पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला असता. मात्र, तसे होण्याआधीच कुत्र्याने सापाचा जीव घेतला. या दोन्ही प्राण्याच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghatkopar News: होर्डिंग्ज मालकासह सर्व दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, दानवेंची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत मागणी

Ghatkopar Hoarding Case: होर्डिंग दुर्घटनेला ५० तास उलटून गेले, बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा १७ वर, जोडपं अजूनही सांगाड्याखालीच

Tips to Increase Memories: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे नवे प्रयोग करून बघा!

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृत्यूंचा आकडा १७ वर

PM Modi Rally: काँग्रेसकडून सुरू असलेला हिंदू-मुस्लिमचा खेळ केला उघड, PM मोदींचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT