Wild Animal in Rashtrapati Bhavan:  Saam tv
देश विदेश

Leopard at Rashtrapati Bhavan : अरे बापरे बाप! मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात बिबट्या? राष्ट्रपती भवनातील VIDEO ने खळबळ

Rashtrapati Bhavan Leopard viral video : राष्ट्रपती भवनातील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात एक प्राणी शिरल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तो बिबट्या असल्याचं बोललं जात आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टर्मसाठी राष्ट्रपती भवनात रविवारी सांयकाळी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदी यांच्यासहित ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. या कार्यक्रमाला ६ हजारांहून अधिक लोकांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात एक निमंत्रण न देता आलेला पाहुणाही पोहोचला होता. या पाहुण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राष्ट्रपती भवनातील एक १२ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मंत्री दु्र्गादास उइके शपथ घेताना दिसत आहेत. यावेळी मागे पायऱ्यांजवळ एक प्राणी मोठ्या डौलात चालताना दिसत आहे. हा प्राणी नेमका कोणता आहे, यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. अनेकांना हा प्राणी बिबट्या वाटत आहे.

अनेकांना व्हिडिओमधील दिसणारा प्राणी बिबट्या वाटत आहे, त्यामुळे अनेक जण सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करत आहेत. खरंच तो बिबट्या असेल तर तो मंचाजवळ का आला नाही, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच राष्ट्रपती भवनातील इतक्या मोठ्या कार्यक्रमात हा प्राणी सहज वावरत होता, यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे.

व्हिडिओत दिसणाऱ्या प्राण्याच्या आकारावरून तो बिबट्या असल्याचं बोललं जात आहे. तर काही लोकांनी पाळीव प्राणी असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी हा व्हिडिओ फेक असल्याचं म्हटलं आहे.

शपथविधी सोहळ्यातील कार्यक्रमातही हा प्राणी दिसत आहे. या प्राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रपती भवनातील सुरक्षेवर काही जण सोशल मीडियाद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या कार्यक्रमात सुरक्षा जवानांनी याबाबत दक्षता घेतली नाही, असाही सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी शेकडो प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने व्हिडिओमध्ये दिसणारा प्राणी हा मांजर असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने म्हटलं की, तो कुत्राही असू शकतो. पण आतापर्यंत तो प्राणी कोणता होता, याबाबत ठोस काही कळू शकलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

SCROLL FOR NEXT