विमानातून प्रवास करताना प्रत्येकाला आपला फोन फ्लाइट मोडवर ठेवावा लागतो. फोन एकदा फ्लाइट मोडवर आला की त्यातील इंटरनेट सेवा पूर्णत: बंद होते. इंटरनेटच्या दुनियेपासून आपण प्रवासा करताना दूर राहतो. मात्र आता प्रवाशांना विमानात देखील इंटरनेट वापरता येणार आहे.
विमानातसुद्धा तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. WiFi सुविधेसाठी सरकारने नियमांमध्ये बदल केला आहे. सरकारने नियमात केलेल्या या बदलामुळे विमान प्रवासादरम्यान तुम्ही मनसोक्त इंटरनेट वापरू शकणार आहात. विमान उड्डाणादरम्यान प्रवासी 3 हजार मीटर उंची गाठल्यानंतरच WiFi च्या माध्यमातून इंटरनेट सेवा वापरू शकणार आहेत. जमिनीवरील दूरसंचार सुविधेत कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून ही उंची ठेवण्यात आली आहे.
फ्लाइट अँड सी कनेक्टिव्हिटी (सुधारणा) नियम, 2024 मार्फत यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यातील आदेशात म्हटलं आहे की, ज्या विमानात इलेक्ट्रीक उपकरणे वापरण्याची परवानगी असेल तेथे इंटरनेट सुविधा वायफायमार्फत पुरवली जाईल. या सेवेचा पूर्ण कंट्रोल कॅप्टनकडे असेल. आवश्यकता नसेल तेव्हा वायफाय बंद सुद्धा करता येणार आहे.
विमानाने प्रवास करताना देखील आपल्याला काहीवेळा एमर्जंसी असते. तसेच विविध महत्वाची कामे, मिटींग आणि फोन कॉल किंवा महत्वाचे मेसेज करायचे असतात. मात्र फोन फ्लाइटमोडवर असल्याने काहीच करता येत नाही. अशावेळी वायफाय मार्फत इंटरनेट सेवा उपलब्ध असल्यास तुम्हाला विमानातून प्रवास करताना या सर्व कामांत कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.