अमानवी कृत्य! बायकोची हत्येसाठी नवऱ्याने खोलीत सोडला 'कोब्रा' Saam Tv
देश विदेश

अमानवी कृत्य! बायकोची हत्येसाठी नवऱ्याने खोलीत सोडला 'कोब्रा'

आपल्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी केरळ या ठिकाणी एक व्यक्ती दोषी ठरला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केरळ : पत्नीच्या खोलीत कोब्रा या जातीचा नाग सोडून त्याच्याद्वारे सर्पदंश करवून आपल्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी केरळ या ठिकाणी एक व्यक्ती दोषी ठरला आहे. आरोपी सूरजने आपली २५ वर्षीय पत्नी उत्तराचा हुंड्याकरिता छळ करुन हत्या केल्याचा आरोप आहे. कोल्लम सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला आहे. बुधवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे. पत्नी उत्तरा कोल्लमपासून ४० किलोमीटरवर असलेल्या तिच्या मामाच्या घरात राहत असत. झोपेत असताना तिला नाग चावला, यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना ७ मे २०२० या दिवशी घडली होती.

हे देखील पहा-

यावेळी सूरज- उत्तराच्या लग्नाला २ वर्षे पूर्ण झाली होती आणि त्यांना एक वर्षाचे मूल देखील होते. फिर्यादींनी उत्तराचा पती सूरज एस कुमारवर याच्यावर आरोप केला आहे की, त्याने पत्नीच्या खोलीत मुद्दाम कोब्रा सोडला होता. जेणेकरुन नागाने चावा घेतल्यामुळे तिचा मृत्यू होईल. हा संपूर्ण कट रचण्याअगोदर त्याने आपल्या पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोप देखील त्याच्यावर आहे. तपासात असे देखील समोर आले आहे की, मागील वर्षी २ मार्च या दिवशी सूरजने पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने घरात कोब्रा सोडला होता.

पथानामथिट्टा जिल्ह्यात अदूरजवळ पारकोडे या ठिकाणी पतीच्या घरी असताना उत्तराला नाग चावला होता. त्यावेळेस तिरवल्ला या ठिकाणी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात तिच्यावर जवळपास १६ दिवस उपचार करण्यात आले होते. रसेल वायपर साप चावल्याने ती पूर्णपणे आजारी पडली होती. ती ५२ दिवस अंथरुणावर पडून होती. यानंतर तिची प्लास्टिक सर्जरी करावी लागली होती. उत्तराच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तिची मुलगी आणि सूरज जेवणानंतर झोपायला गेले होते. सूरज उशिरा उठायचा.

दुसऱ्या दिवशी तो लवकर उठून बाहेर गेला होता. तर उत्तराला नेहमीच्या वेळेवर जाग आली नव्हती. तिची आई खोलीत गेली. तेव्हा तिला उत्तरा बेशुद्धावस्थेत आढळली होती. नंतर खोलीची झडती घेतली असता त्याठिकाणी एक नाग सापडला, ज्याला ठार मारण्यात आले होते. सूरजला भरघोस हुंडा देण्यात आला होता. यामध्ये १० लाख रुपये रोख, मालमत्ता, नवीन कार आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. २ वर्षांच्या अयशस्वी विवाह नंतर देखील त्याने अधिक हुंडा मागण्याचा प्रयत्न करत असत, असा आरोप उत्तराच्या आईने यावेळी केला आहे. उत्तराच्या मृत्यूवर तिच्या कुटुंबीयांनी उभा केलेल्या संशयाच्या आधारे सूरजला २४ मे या दिवशी अटक करण्यात आली होती.

१२ जुलै रोजी सूरजने जाहीरपणे कबूल केले की त्याने कोल्लम मधील परीपल्ली या ठिकाणील गारुडी सुरेश कुमार यांच्याकडून १० हजार रुपयांना २ वेळा साप खरेदी करण्यात आले होते. सूरजला विषारी साप विकणारा गारुडी हा या प्रकरणात मुख्य आरोपी असला, तरी १ डिसेंबरपासून सुरु झालेल्या खटल्यात तो सरकारी साक्षीदार बनला आहे. सुनावणीदरम्यान, त्याने हेतू जाणून घेतल्याशिवाय सूरजला नाग विकल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. सूरजवर पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे, तर त्याचे आई- वडील आणि बहिणीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करण्यात आले आहे. या प्रकरणी बुधवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT