Crime News  Saam TV
देश विदेश

Crime News : बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या; Youtubeवरुन शोधली आयडिया, पोलीसही चक्रावले

Haryana Crime News : पतीच्या हत्येसाठी मीनाक्षी यूट्युबवर वेगवेगळ्या आयडिया शोधत होती. महिलेने तिच्या प्रियकरासह पती नीटूविरोधात असा कट रचला की पोलीसही हैराण झाले.

प्रविण वाकचौरे

Crime News :

महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला संपवण्यासाठी महिलेने युट्यूबवरुन आयडिया शोधून काढली. हरियाणातील यमुनानगरमधील ही घटना आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडसह तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी मीनाक्षी हिची साहिल नावाच्या व्यक्तीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीचं नंतर प्रेमात रुपांतर झालं. मात्र साहिलच्या प्रेमात पडताना मीनाश्रीला आपलं लग्न झाल्याचा विसर पडला. मात्र साहिलच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मीनाक्षी प्रेमासाठी पतीचाच काटा काढण्याचं ठरवलं. (latest marathi news)

पतीच्या हत्येसाठी मीनाक्षी यूट्युबवर वेगवेगळ्या आयडिया शोधत होती. महिलेने तिच्या प्रियकरासह पती नीटूविरोधात असा कट रचला की पोलीसही हैराण झाले. इंजेक्शन देऊन रक्तदाब कमी करण्याची घातक कल्पना मीनाक्षीला सुचली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासाठी महिलेने तिचा प्रियकर आणि त्याच्या आणखी एका साथीदारासह रक्तदाब कमी करणारे इंजेक्शन मागवले. यानंतर पतीला इंजेक्शनचा ओव्हरडोज देण्यात आला. यातून पतीचा मृत्यू झाला. पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि पतीचा मृत्यू हा खून असल्याचे कळू नये यासाठी मृतदेह शेतात फेकून दिला. नीटूचा मृतदेह ४ जानेवारीला शेतात सापडला होता.

पोलिसांनी मृतदेहाचा पंचमाना करताना नीटूच्या हातावर इंजेक्शनच्या खुणा दिसल्या. पोलिसांना आधी ड्रग्जचा ओव्हरडोज घेतला असावा असे वाटले. मात्र नीटूने कोणतेही ड्रग्स घेतले नसल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं.

नीतूचा मृत्यू रक्तदाब कमी करणाऱ्या औषधाच्या ओव्हरडोजमुळे झाल्याचे समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी नीटूची पत्नी मीनाक्षी हिचे मोबाईल कॉल डिटेल्स चेक केले. त्यामुळे संशय आणखी बळावला. पोलिसांनी तपास केला असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

पोलीस तपासात मीनाक्षी आणि तिच्या बॉयफ्रेंडने आणखी एकाच्या मदतीनी नीटूची हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

SCROLL FOR NEXT