RBI Decision on 20000 note
RBI Decision on 20000 note  Saam TV
देश विदेश

RBI Decision on 2000 Note: रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट का बंद केली? जाणून घ्या 5 कारणे

साम टिव्ही ब्युरो

RBI Decision on 2000 Note : रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या नोटा काही काळासाठी वैध राहतील.

बँका बदलून घेण्यासाठी नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 2000 नोटांच्या बदलून घेण्याची प्रक्रिया 23 मे पासून सुरू होणार आहे. मात्र रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय का घेतला? हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे.

2000 रुपयांच्या नोटा छापण्याच उद्देश

नोटबंदीनंतर  रिझर्व्ह बँकने नोव्हेंबर 2016 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. नोटाबंदीच्या काळात काढण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी व्हावा म्हणून त्यावेळी 2000 रुपयांची नोट आणली होती.

चार-पाच वर्षांचे शेल्फ लाइफ ओलांडले

आरबीआयच्या म्हणण्यानुसार 2000 रुपयांच्या सुमारे 89 टक्के नोटा मार्च 2017 पूर्वी जारी करण्यात आल्या होत्या. या नोटांनी त्यांचे चार-पाच वर्षांचे शेल्फ लाइफ ओलांडले आहे किंवा ओलांडणार आहेत.

चलनातील नोटांची संघ्या खूपच कमी

31 मार्च 2018 पर्यंत 6.73 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. म्हणजेच एकूण नोटांमध्ये त्यांचा वाटा 37.3 टक्के होता. 31 मार्च 2023 पर्यंत हा आकडा 3.62 लाख कोटी रुपयांवर आला आहे. म्हणजेच चलनात असलेल्या एकूण नोटांमध्ये 2000 रुपयांच्या फक्त 10.8 टक्के नोटा शिल्लक होत्या.

उद्देशही पूर्ण झाला

नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्या. बँकांमध्ये इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या, तेव्हा दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देशही पूर्ण झाला. त्यामुळे 2018 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाईही बंद करण्यात आली होती.  (Latest Marathi News)

व्यवहारातील कमी वापर

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 2,000 रुपयांच्या नोटांचा व्यवहारात फारसा वापर केला जात नाही. याव्यतिरिक्त, इतर मूल्यांच्या नोटा देखील सामान्य लोकांसाठी पुरेशा चलनात अस्तित्वात आहेत. त्यामुळे आरबीआयच्या क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

Bus Fire News: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव; खळबळजनक घटना

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

SCROLL FOR NEXT