Anju India Return Reason Saam TV
देश विदेश

Anju India Return Reason: अंजू पाकिस्तानातून का पळून आली? कारण चक्रावणारं, आता भारतातूनही गायब?

Anju Return in India: नसरुल्लाहने अंजूच्या दाव्याचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तानी मीडियाशी केलेल्या संवादात नसरुल्लाहने अंजूच्या भारतात परतण्याचं खरं कारण सांगितलं आहे.

Satish Daud

Anju India Return Reason

पाच महिन्यांपूर्वी प्रेमासाठी आपल्या नवऱ्यासह मुलांना सोडून पाकिस्तानात पळून गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली. वाघा बॉर्डरवरून भारतात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी देखील केली. यावेळी तिने अनेक खुलासे केले.

मी पाकिस्तानी तरुणासोबत निकाह केला असून पोटच्या मुलांना भेटण्यासाठी भारतात आले आहे, असं तिने पोलिसांना सांगितलं. अंजूचा पती आणि मुलं राजस्थानच्या भिवाडी जिल्ह्यात राहतात. अंजूने मुलांना भेटण्याचा प्रयत्न देखील केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र, मुलांनी तिला भेटायचं नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. आता एकाकीच अंजू भारतातूनही गायब झाल्याची माहिती आहे. काही हिंदी माध्यमांनी याबाबतचं वृत्त दिलं आहे. त्यामुळे अंजूचं पाकिस्तानातून परतण्याचं नेमकं कारण काय? ती नेमकी कुठे आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, अंजूचा पती नसरुल्लाहने पाकिस्तानी मीडियासोबत बोलताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. नसरुल्लाहने अंजू भारतात परतण्याचं दुसरंच कारण सांगितलं आहे. मुलांची आठवण येत असल्याने मी भारतात काही दिवसांसाठी परत आले, असं अंजूने माध्यमांना सांगितलं होतं.

मात्र, नसरुल्लाहने अंजूच्या या दाव्याचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तानी मीडियाशी केलेल्या संवादात नसरुल्लाहने अंजूच्या भारतात परतण्याचं खरं कारण सांगितलं आहे. अंजूचा व्हिसाची मुदत संपली होती. वारंवार विनंती करूनही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने वारंवार तो वाढवला नाही.

ती महिनाभरापासून व्हिसाशिवाय पाकिस्तानात राहत होती. अंजूचा व्हिसा १ वर्षासाठी वाढवला असता तर बरे झाले असते, पण तसे झाले नाही, असे नसरुल्लाहने सांगितलं आहे.

अंजू नसरुल्लाहची लव्ह स्टोरी

एकीकडे पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीणा यांच्या अनोख्या प्रेमकथेची चर्चा रंगत होती. तर दुसरीकडे राजस्थान येथे राहणारी अंजू पाकिस्तांनी तरुणाच्या प्रेमात पडली. फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर अंजूने प्रेमासाठी पतीसह मुलांना सोडून थेट पाकिस्तान गाठलं.

तिथे गेल्यानंतर तिने नसरुल्ला नावाच्या तरुणासोबत विवाह देखील केला. इतकंच नाही, तर अंजूने इस्लाम धर्मही स्वीकारला. तसेच तिने आपले नाव बदलून फातिम असे ठेवले. पुढे या गोष्टीची बरीच चर्चा झाली होती. अंजूच्या या कृत्यामुळे तिच्या पतीने आपण अंजूसोबतचे सर्व संबंध तोडत असल्याचं जाहीर केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT