Ayodhya Ram Mandir Saam Digital
देश विदेश

Ram Mandir News : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही शंकराचार्य उपस्थित राहणार नाहीत, काय आहे कारण?

Ram Mandir News Update :ज्योतिर्मथ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले आहे की, देशातील चारही शंकराचार्य 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.

प्रविण वाकचौरे

Ram Mandir News :

राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला चारही शंकराचार्य उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. मंदिर अद्याप पूर्णपणे निर्माण झालेले नाही, त्यामुळे बांधकाम पूर्ण न झालेल्या मंदिरात देव बसवणे धार्मिक नाही. आम्ही मोदीविरोधी नाही, पण आम्हाला धर्मविरोधीही व्हायचे नाही, असं शंकराचार्यांनी म्हटलं आहे.

ज्योतिर्मथ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले आहे की, देशातील चारही शंकराचार्य 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या मते हा कार्यक्रम शास्त्रानुसार आयोजित केला जात नाहीये.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. या व्हिडीओमध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणत आहेत की, हे रामानंद पंथाचे मंदिर आहे तर चंपत राय तिथे काय करत आहेत. या लोकांनी तिथून दूर जावे. बाजूला होऊन रामानंद पंथाच्या हाती प्रतिष्ठा द्या.

मंदिर अद्याप बांधलेले नाही. अशी कोणतीही परिस्थिती नाही ज्यामुळे हे अभिषेक लवकर करावे लागेल. अशा परिस्थितीत योग्य क्षणाची आणि वेळेची वाट पाहिली पाहिजे. आम्ही मोदी विरोधी नाही पण आम्हाला धर्मशास्त्रविरोधीही व्हायचे नाही, असं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

SCROLL FOR NEXT