BJP New CM News Saam Tv
देश विदेश

BJP New CM News: तीन राज्यांचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपच्या संसदीय मंडळाची उद्या बैठक; CM च्या नावांवर होणार चर्चा

Satish Kengar

BJP New CM News:

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संसदीय मंडळाची गुरुवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या तीन राज्यांतून एकूण 65 खासदार लोकसभेत येतात. अशातच विधानसभा निवडणुकीतील विजयाने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा उत्साह वाढणार आहे.

याआधी विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या दोन केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या 10 खासदारांनी लोकसभेचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर या 10 खासदारांनी राजीनामे दिले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी भाजपची उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या निवड प्रक्रियेवर चर्चा करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मध्य प्रदेशात सत्ता राखली, तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. (Latest Marathi News)

भाजपने तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. या निवडणुकीत पक्षाने भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे केला होता. निवडणुकीच्या निकालानंतरही भाजपने अद्याप तीनपैकी कोणत्याच राज्यात मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर केलेले नाही. मात्र, उद्या तिन्ही राज्यांना नवीन मुख्यमंत्री मिळू शकतात.

गुरुवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप संसदीय पक्षाची पहिली बैठक होणार आहे आणि तीन विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला मोठ्या विजयासाठी नेतृत्व केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार होण्याचीही शक्यता आहे. भाजपच्या संसदीय पक्षात लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचा समावेश आहे. हा गट साधारणपणे दर आठवड्याला सत्रादरम्यान भेटतो. बैठकांमध्ये पंतप्रधान मोदींसह भाजप नेते संसदेच्या अजेंडा आणि विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा करतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT