Stormy Daniels News: अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे. एका पोर्न स्टारला गुप्तपणे पैसे दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री ट्रम्प यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. एखाद्या प्रकरणात अटक झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. (Breaking Marathi News)
याशिवाय गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरे जावे लागलेले ते पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होताच अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. भारतातही या प्रकरणाची मोठी चर्चा होत आहे. दरम्यान, ट्रम्प यांना अटक होताच स्टॉर्मी डॅनियल आहे तरी कोण आहे? तिचा ट्रम्प यांच्याशी काय संबंध? हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, स्टॉर्मी डॅनियल ही अमेरिकेतील अडल्ट चित्रपटात काम करणारी पोर्न स्टार आहे. स्टॉर्मी पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. हे आरोप तिने आपले जीवचरित्र लिहताना एका पुस्तकात केला होता. स्टॉर्मी डॅनियलने आतापर्यंत चार वेळा लग्न केलं आहे. तिला एक मुलगा देखील आहे. (Latest Marathi News)
स्टॉर्मीने आपले हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्ट्रिप क्लबमध्येही काम केले आहे. २००९ साली तिने यूएस सिनेट आणि २०१० मध्ये लुईझियाना सिनेटच्या जागेसाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. उमेदवारी करण्याचा तिचा इरादा जाहीर केला आहे. स्टॉर्मीने तिच्या पुस्तकात अनेक रहस्ये उघड केली आहेत. त्याने लिहिले की, तिच्या वडिलांनी घटस्फोट घेतल्यानंतर आईने तिचा सांभाळ केला. स्टॉर्मीने सांगितले की, वयाच्या ९व्या वर्षीही तिचे लैंगिक शोषण झाले होते.
स्टॉर्मी डॅनियलने आरोप केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘द अँप्रेटिस’ या रिॲलिटी शोमध्ये काम देण्याचा बहाणा करून तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. ही गोष्ट लपवण्यासाठी ट्रम्प यांनी तिला पैसेही दिले.
स्टॉर्मीचा आरोप आहे की, ती २००६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेटली होती. यादरम्यान अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी तिला हॉटेलमधील खोलीत जेवणासाठी आमंत्रित केले होते. जेव्हा ती रुममध्ये गेली तेव्हा ट्रम्प यांनी तिच्यासोबत जवळीक साधली. आणि काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले.
दरम्यान, स्टॉर्मी डॅनियलने केलेले हे आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावले आहेत. दरम्यान २००६ साली या दोघांचाही एकमेकांसोबतचा एक फोटो प्रसिद्ध झालेला आहे. स्टॉर्मीच्या या आरोपांची चौकशी झाल्यानंतर मॅनहॅटनमधील न्यायालयात ट्रम्प यांच्यावर नुकतेच आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
एकूण ३० कलमांतर्गत ट्रम्प यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून ट्रम्प यांना अटक करण्यात आलेली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती सुनावणीदरम्यान समोर येणार असल्याचं अमेरिकेतील माध्यमांनी म्हटलं आहे. न्यायालयाने ट्रम्प यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यास मनाई केली असून न्यायालयात फक्त पाच छायाचित्रकार उपस्थित असतील.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.