Lok Sabha Election Results: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या घसरत्या आलेखाला जबाबदार कोण? प्रशांत किशोर यांनी दिलं उत्तर
Prashant Kishor on BJP Saam TV
देश विदेश

Lok Sabha Election Results: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या घसरत्या आलेखाला जबाबदार कोण? प्रशांत किशोर यांनी दिलं उत्तर

Satish Kengar

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला झालेल्या पराभवाचे कारण सांगितले आहे. याशिवाय भाजपच्या घसरत्या आलेखाला जबाबदार कोण, हेही त्यांनी सांगितलं आहे.

प्रशांत किशोर म्हणाले आहे की, भाजपचे 208 जुने खासदार विजयी झाले. पण हरले तेच आहेत जिथे उमेदवार न पाहता कोणालाही तिकीट दिले गेले. पश्चिम बंगाल, बिहार इत्यादी ठिकाणी योग्य उमेदवारी न दिल्याने त्यांचा पराभव झाला.

ते म्हणाले, भाजपला हे माहित होते आणि त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणात कोणते उमेदवार पराभूत होत आहेत, हे देखील समोर आले होते. मात्र त्यांनी काळजी न करता पंतप्रधान मोदींची सभा झाली तर विजय होईल, असा विश्वास ठेवत तिकीट दिले. अशा अनेक जागा आहेत, जिथे भाजपने सर्वेक्षणाच्या विरोधात जाऊन तिकिटे दिली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया टुडेशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, “ज्याने पहिल्यांदा 400 पारचा नारा लिहिला, त्यात काही चुकीचं नव्हतं. मात्र 400 च्या पुढे जागा का हव्यात, याचे कारण त्यांनी सांगितलं नाही. यामुळेच 400 पारचा नारा हा काही लोकांना अहंकार वाटू लागला. तर काहींना हे षडयंत्र वाटले, ज्याचे भांडवल करून विरोधकांनी भाजप संविधान बदलतील, असं सांगितलं.''

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, भाजपचा 400 पारचा नारा ज्याने लिहिला, त्याने तिथे सर्वात मोठी चूक केली. 400 पारचा हा नारा आला तेव्हा भाजपच्या काही नेत्यांनी संविधान बदलण्यासाठी 400 पारची गरज असल्याचे सांगितले. यामुळे भाजपचे सर्वत्र नुकसान झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravindra Waikar News | 'भाजपकडे कमळ छाप पावडर' वायकरांच्या क्लिनचिटवरुन कॉंग्रेस आक्रमक..

Maharashtra Live News Updates : लक्झरी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

Akola News : शाळा उघडताच अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; खिचडी बनवणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

Pune Porsche Accident | अल्पवयीन आरोपीकडून 300 शब्दांचा निबंध सादर! निबंधात 'तो' जाणीवपूर्व टाळला?

Ranveer Singh Birthday : लेखक ते 'गल्ली बॉय'; सुपरस्टार रणवीर सिंगचा कसा आहे जीवनप्रवास?, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT