आधुनिक युगात शेतीची पद्धत बदलली आहे. बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आणि आता हातांऐवजी ड्रोनने शेतात कीटकनाशकांची फवारणी केली जाते. उत्तर प्रदेशातील सीतापूर भागात सुनीता नावाची एक महिला आहे. ज्या शेतकऱ्यांना ड्रोन वापरायला शिकवतात.
सीतापूर आणि परिसरातील लोक त्यांना 'ड्रोन दीदी' म्हणून ओळखतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' कार्यक्रमाच्या 110 व्या भागात ड्रोन दीदीशी संवाद साधला, त्यानंतर सोशल मीडियावर त्यांची खूप चर्चा होत आहे आणि लोक त्यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, ड्रोन दीदी सिधौली ब्लॉकमधील रत्नपुरा येथील रहिवासी आहे. त्यांच्या कुटुंबात पती, दोन मुले आणि सासू आहे. सुनीता यांनीपदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्या शेतकरी कुटुंबातील आहे. जेव्हा कीटक शेतातील पिके खराब करतात तेव्हा त्यांच्या संरक्षणासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी बराच वेळ आणि त्रास होतो. अशातच ही समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा विचार केला आणि त्यानंतर त्यांना ड्रोनची माहिती त्यांनी मिळवली. (Latest Marathi News)
सुनीता यांनी अलाहाबाद येथून एका कंपनीतून ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला त्या ड्रोन घेऊन त्यांच्या शेतात पोहोचल्या तेव्हा तिथे लोकांची गर्दी झाली होती. काहींनी त्याची खिल्लीही उडवली, पण आता वेळ आणि पीक वाचवण्यासाठी ते ड्रोनची मदत घेतात. तसेच लोक आता त्यांचं कौतुकही करत आहेत.
सुनीता यांच्या म्हणण्यानुसार, ड्रोनच्या सहाय्याने एकाच ठिकाणी उभे राहून संपूर्ण शेतावर लक्ष ठेवता येते. शेतात लहान कीटक वगैरे उडवण्याचे कामही ड्रोन करतात. याशिवाय शेतात खत टाकण्याचे काम असो की, कीटकनाशकांची फवारणी असो, ड्रोनमुळे शेती करणे सोपे झाले आहे. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी सुनीता यांना शेतीत ड्रोन वापरण्याचा अनुभव विचारला. सुनीता यांच्या म्हणण्यानुसार, शेती करताना लागणारा वेळ ड्रोनने निम्मा केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.