ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लसूण-मिरचीची लाल चटणी साउथ इंडियन पदार्थांसोबत देखील दिली जाते, ज्यामुळे जेवणात एक तिखट चव येते.
ही चविष्ट आणि मसालेदार चटणी उत्तरेतही लोकप्रिय झाली आहे. घरोघरी ही चटणी बनवून खाल्ली जाते.
जर तुम्हीसुध्दा लसूनची लाल मिरचीची चटणी खाण्यास आवडत असेल तर, तीला सोप्या पध्दतीने बनवू शकता. तर जाणून घ्या रेसिपी.
चटणीकरिता लसून, लाल मिरची, तेल आणि मिठ
सर्वात प्रथम, लसनाच्या पाकळ्या निसून पाण्याने धुवून ठेवा.
आता लाल मिरचीचे देठ काढून आर्धे तुकडे करुन घ्या. यानंतर मिरचीला पाण्यात टाकून उकळून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवा. आता गरम झालेल्या तेलात लसनाच्या पाकळ्या टाका आणि त्या हलक्या तपकिरी होईपर्यंत परतून घ्या.
लसनाच्या पाकळ्या परतून घेतल्यानंतर उकळवून घेतलेल्या लाल मिरचीला मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करुन घ्या.
चटणी मिक्सरमध्ये बारीक झाल्यावर चवीनुसार मीठ घाला. चटणी तयार आहे.