Rajasthan CM Bhajan Lal Sharma Saam Tv
देश विदेश

Rajasthan CM Bhajan Lal Sharma: राजस्थानला मिळाले नवे मुख्यमंत्री,नवे CM भजनलाल शर्मा यांची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

Rajasthan CM : राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे राजकारणात खूप वर्षांपासून सक्रिय आहेत. नव्याने राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेल्या भजनलाल शर्मा यांच्याकडे सध्या किती संपत्ती आहे, याबाबत माहिती जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rajasthan CM Bhajan Lal Sharma Net Worth:

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. दिल्लीतील बैठकीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबरमध्ये देशात पाच राज्यातील निवडणुका पार पडल्या. यात तीन राज्यात भाजपाने विजय मिळवला आहे. विजयानंतर भाजपने मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर आता राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांची निवड करण्यात आली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे राजकारणात खूप वर्षांपासून सक्रिय आहेत. नव्याने राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेल्या भजनलाल शर्मा यांच्याकडे सध्या किती संपत्ती आहे, याबाबत माहिती जाणून घेऊ.

राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सांगानेर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे पुष्पेंद्र भारद्वाज यांना मात देत ४८,०८१ मतांनी जिंकले. राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल यांची संपत्ती कोटीच्या घरात आहे. त्यांची एकूण संपत्ती १ कोटी ४६ लाख रुपये आहे.

विधानसभा निवडणुकीत संपत्तीबाबत दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे १ लाख १५ हजार रोख रक्कम आहे. तर बँकेत ११ लाख रुपये आहेत. भजनलाल यांच्या पत्नीकडे १.५० लाख रोख रक्कम तर बँकेत १० हजार रुपये आहेत. तसेच त्यांच्या नावावर ३५ लाखांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे तीन तोळे सोने आहे. याची किंमत जवळपास १ लाख ८० हजार रुपये आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचे शेअर्स किंवा बॉण्डसमध्ये गुंतवणूक केली नाही. त्यांच्या नावावर LIC, HDFC LIFE इन्शुरन्स पॉलिसी आहेत. या पॉलिसीची किंमत २ लाखाच्या घरात आहे. तसेच त्यांच्याकडे टाटा सफारी आहे. ज्याची किंमत ५ लाख रुपये आहे. तसेच टीव्हीएस क्विटर मोटार सायकल आहे. या बाईकची किंमत ३५ हजार रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

Maharashtra News Live Update: पुण्यात पाणीटंचाईची झळ! स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटरसाठी लवकरच नियमावली

Spices Storage Tips: मसाले फ्रिजमध्ये ठेवावेत की बाहेर? जास्त काळ फ्रेश आणि सुगंधी ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या!

Horoscope : दिवाळीआधी या ४ राशींचं नशीब चमकणार? पैशाच्या अडचणी होतील दूर अन् नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग

SCROLL FOR NEXT