Arvind Panagariya x Columbia university
देश विदेश

Who is Arvind Panagariya : कोण आहेत वित्त आयोगाचे १६ वे अध्यक्ष झालेले अरविंद पनगढिया?

Finance Commission: अरविंद पनगढिया हे वित्त आयोगाचे १६ वे अध्यक्ष असतील. अरविंद पनगढिया यांनी आशियाई विकास बँकेत (ADB) मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम केलंय. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), जागतिक बँक आणि जागतिक व्यापार संघटना (WTO) मध्येही वरिष्ठ पदांवर काम केले आहे.

Bharat Jadhav

Who is Arvind Panagariya New Chairman Of Finance Commission :

केंद्र सरकारने वित्त आयोगाच्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा केलीय. अरविंद पनगढिया हे वित्त आयोगाचे १६ वे अध्यक्ष असतील. अरविंद पनगरिया याआधी NITI आयोगाचे माजी उपाध्यक्षही होते. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार डॉ. अरविंद पनगढिया यांची १६व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय. (Latest News)

दरम्यान पनागढिया हे जेव्हा नीती आयोगाच्या उपाध्यक्ष होते, त्यावेळी त्यांनी उत्कृष्ट काम केलं होतं. त्यांचे कामाने प्रभावित होऊन पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांचे खूप कौतुक केले होते. पनगढिया हे कोलंबिया विद्यापीठ (Columbia university), न्यूयॉर्क येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक (Professor) आहेत. यापूर्वी, अरविंद पनगढिया यांनी आशियाई विकास बँकेत (ADB) मुख्य अर्थतज्ज्ञ (economist) म्हणून काम केलंय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), जागतिक बँक आणि जागतिक व्यापार संघटना (WTO) मध्येही वरिष्ठ पदांवर काम केले आहे. अरविंद पनगढिया यांचे बंधू डॉ. अशोक पनगढिया हे देशातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट आणि वैद्यकीय संशोधक आहेत. अरविंद पनगढिया यांनी १९७८ 8 मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी पदवी मिळवली. त्यानंतर ते कॉलेज पार्क येथील मेरीलँड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

अरविंद पनगढिया यांचा जन्म ३० सप्टेंबर १९५२ रोजी नागौर जिल्ह्यातील ओसियाच्या पूर्वेला असलेल्या पानगढ गावात झाला. अरविंद पनगढिया हे यांचे वडील बाळू लाल पनगढिया हे जयपूरच्या लोकवाणी या स्थानिक वृत्तपत्राचे संपादक होते. बाळू लाल पनगरिया यांनी ‘राजस्थान में स्वतंत्रता संग्राम’ (राजस्थानमधील स्वातंत्र्य संग्राम) हे पुस्तक लिहिले आहे, जे राजस्थानमधील स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT