WhatsApp New feature, Tech News updates in Marathi
WhatsApp New feature, Tech News updates in Marathi Saam TV
देश विदेश

'WhatsApp' चा भन्नाट फिचर आला, मर्जीने दाखवा कुणालाही स्वत:चा फोटो आणि स्टेटस

नरेश शेंडे

दैनंदिन जीवनाताली अविभाज्य घटक बनलेल्या आणि सर्वात लोकप्रिय झालेल्या व्हाटस् अॅपने (WhatsApp New Feature) युजर्ससाठी एक भन्नाट फिचर आणले आहे. या दमदार फिचरला विशेष महत्व देण्यात आलं आहे, कारण या फिचरद्वारे युजर त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणत्याही व्यक्तीला प्रोफाईल फोटो (WhatsApp profile Photo), लास्ट सीन स्टेटस आणि अबाऊट हाईड करु शकता. दरम्यान, ही सुविधा गेल्या काही काळापासून बीटी व्हर्जनमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे. व्हाट्स अॅपने घोषणा केली आहे की, व्हाट्स अॅप आता सर्व IOS आणि Android यूजर्ससाठी रोल आऊट करत आहे. आतापर्यंत युजर्सला सेटिंगमध्ये तीन खासगी विकल्प Everyone, My contacts आणि Nobody दाखवण्यात येत होते. (Tech News updates in Marathi)

My contacts Except विकल्प ?

व्हाट्सअॅपच्या (WhatsApp) नव्या फिचरमुळं युजर्सला आता My contacts Excepts नावाचं एक अतिरिक्त विकल्प दाखवण्यात येणार आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यावर युजर्सला त्या स्पेसिफिक कॉन्टॅक्ट्सला सिलेक्ट करावं लागेल, ज्यामुळे तुम्हाला तुमची माहिती त्या कॉन्टक्ट्सला दाखवता येणार नाही. एवढच नाही तर लास्ट सीनही पाहता येणार नाही. या विकल्पाला अकाउंट सेटिंग्समध्ये खासगी सेटिंग्समध्ये जाऊन अॅक्सेस केलं जावू शकतं.

WhatsApp वर प्रोफाईल फोटो आणि इतर काही गोष्टी लपवू शकता

तुमचा प्रोफाईल फोटो, लास्ट सीन आणि अबाऊट डिटेल्सला विशेष व्यक्तीपासून लपवायचं झाल्यास तुम्हाला फक्त व्हा्टसअॅप ओपन करुन सेटिंग्जवर जावं लागेल. त्यानंतर अकाउंटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तु्म्हाला प्रायव्हसी वर जावं लागेल. त्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट लीस्ट मधले नंबर निवडू शकता ज्यांच्यापासून तुम्हाला माहिती लपवायची आहे.

ग्रुप कॉलसाठी नवीन फिचर

यापूर्वी व्हाट्सअॅपने ग्रुप कॉलिंगसाठी एक नवं फिचर आणलं होतं. या फिचरच्या मदतीनं तुम्ही ग्रुप चॅटींगमध्ये असलेल्या कोणत्याही व्यक्तीला म्यूट करु शकता. जेव्हा एखाही व्यक्ती व्हाईस कॉलच्या माध्यमातून स्वत:ला म्यूट करणं विसरेल त्यावेळी कॉल वर म्यूट करण्याचा फिचर फायदेशीर ठरेल. तसंच ज्या व्यक्तीनं या कॉलमध्ये सहभाग घेतला आहे, ती व्यक्ती अनम्यूट बटन दाबून स्वत:ला कधीही अनम्यूट करु शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Contractors Engineer: राज्यातील अभियंता कंत्राटदार ७ मे पासून करणार काम बंद

Today's Marathi News Live : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली

Sanjay Nirupam Joins Shinde Group | संजय निरूपम यांचा शिंदे गटात प्रवेश

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

Thane Naresh Mhaske News | उमेदवारी फॉर्म भरताना दोन गटात राडा, काय झालं बघाच!

SCROLL FOR NEXT